Air India Plane Crash saam tv
महाराष्ट्र

Air India Plane Crash: मुलगा अन् सासूला घेऊन लंडनला निघाली, अहमदाबाद विमान अपघातामध्ये नागपूरच्या महिलेचा कुटुंबासह मृत्यू

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातामध्ये २४२ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामध्ये नागपूरच्या महिलेचा देखील मृत्यू झाला. ही महिला दीड वर्षांचा मुलगा आणि सासूसोबत लंडनला जात होती. या तिघांचाही अपघातामध्ये मृत्यू झाला.

Priya More

गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली. लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेकऑफ घेतल्यानंतर कोसळले. या विमान अपघातामध्ये २४२ प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये नागपूरच्या एका महिलेसह तिच्या कुटुंबाचा देखील समावेश आहे. मूळच्या नागपूरच्या असणाऱ्या यशा कामदार यांच्यासह त्यांची सासू आणि मुलाचा या विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद विमान अपघातामध्ये यशा कामदार, त्यांचा मुलगा रुद्र आणि सासू रक्षा मोढा यांचा मृत्यू झाला. यशा कामदार यांचे माहेर नागपूरचे आहे. नागपुरमधील क्वेटा कॉलनीत त्या राहत होत्या. यशा कामदार या आपल्या मुलाला आणि सासूला घेऊन लंडनला निघाल्या होत्या. पण लंडनला जाण्यापूर्वीच अनर्थ घडला आणि या विमान अपघातामध्ये तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

नागपूरमधील स्थानिक माजी नगरसेवक मनोज चाफले यांनी सांगितले की, 'यशा कामदार यांच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती मिळताच ते अहमदाबादसाठी रवाना झाले. यशाचे तीन ते चार वर्षापूर्वी लग्न झाले होते. तिला दीड वर्षांचा मुलगा होता. यशाचे सासरचे आडनाव मोडा आहे. ते सर्वजण अहमदाबादमध्ये राहतात.

मनोज चाफले यांनी सांगितले की, 'यशा, तिचा मुलगा आणि सासू हे सर्वजण अहमदाबादवरून शोकसभेसाठी लंडनला जाण्यासाठी निघाले होते आणि ही दुर्दैवी घटना घडली. ही ऐवढी मोठी दुर्घटना घडल्यामुळे इशाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.' तसंच, यशा कामदार मोढा या लंडनला जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांच्या कागदपत्रांमध्ये अपूर्णता सुद्धा होती. पण त्यांनी विनंती करून हा सगळा प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Gochar 2025: गणेश चतुर्थीपासून चमकणार 'या' २ राशींचं नशीब; बुध ग्रहाच्या गोचरमुळे बसणार धन

Shatataraka Nakshatra : कुंभ राशीचे रहस्य; शततारका नक्षत्रातील लोक का असतात वेगळे? स्वभाव, काम आणि रोग जाणून घ्या

Horoscope: आयुष्यात घडतील आश्चर्यकारक गोष्टी; व्यवसायात दुप्पट प्रगती, वाढेल आदर,जाणून घ्या राशीभविष्य

Kumbha Rashi : आरोग्यात काळजी, नोकरी-व्यवसायात प्रगती, कसा असेल कुंभ राशीचा आजचा दिवस

Gautam Gaikwad Missing: सिंहगडावरील गौतमचा अपघात की घातपात? सीसीटीव्हीतील हुडीवाल्यामुळं गूढ वाढलं

SCROLL FOR NEXT