ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अहमदाबाद विमानतळाजवळ भयंकर अपघात झाला असून त्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अपघातात एअर इंडियाचे विमान असून त्यात सुमारे २४२ प्रवासी होते, असे समजते.
कोसळलेले AI171 विमान एअर इंडियाचं होतं, ज्यामध्ये अनेक प्रवासी बसलेले होते, अशी माहिती मिळाली आहे.
हे विमान अहमदाबाद विमानतळावरून लंडनच्या दिशेने निघालं होतं, असं प्राथमिक माहितीनुसार समजत आहे.
या विमानाने ठरलेल्या वेळेनुसार अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केले होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
टेक ऑफनंतर केवळ दहा मिनिटांतच हे विमान थेट जमिनीवर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.
विमान कोसळलेल्या भागात घरे असून, दुर्घटनेनंतर लगेच विमानाला आग लागून पूर्ण चकनाचूर झाल्याची माहिती मिळाली आहे.