Nagpur News  Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur: कुत्र्याला पाहून घाबरला, पळताना ५ व्या मजल्यावरून पडला; १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Nagpur News: नागपुरमध्ये इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कुत्रा मागे लागल्यामुळे पळत असताना या मुलाचा तोल गेला आणि तो खाली पडला.

Priya More

पराग ढोबळे, नागपूर

नागपुरमध्ये मोकाट कुत्र्यामुळे १२ वर्षांच्या मुलाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली. मोकाट कुत्रा मागे धावत असल्यामुळे घाबरून पळणाच्या मुलाचा पाचव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला. नागपूरच्या कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीमध्ये ही घटना घडली. मुलाच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरमधील पावनगावच्या प्रभासुपीतील देव हाइट्समध्ये ही घटना घडली. जयेश बोकड (१२ वर्षे) असे मृत मुलाचे नाव आहे. ही १० मजली इमारत असून इमारतीचा बांधकाम सध्या सुरू आहे. रविवारी सुट्टी असल्यामुळे मुलं खेळायला याठिकाणी गेले होते. खेळल्यानंतर जयेश पाचव्या मजल्यावर स्वतःच्या घरी जात होता. यावेळी मोकाट कुत्रा अचानक त्याच्या अंगावर धावू लागला.

कुत्रा मागे येत असल्याचे पाहून घाबरलेला जयेश धावून लागला. त्याचवेळी उघडे असलेल्या खिडकीतून त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. यामध्ये जयेश गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. डॉक्टरांनी जयेशला मृत घोषित केलं. मोकाट कुत्र्यामुळे जयेशचा जीव गेल्यामुळे खळबळ उडाली आहे.

आपलं सोन्यासारखं लेकरू गमावल्यामुले जयेशच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला. रडून रडून ते बेहाल झाले आहेत. या प्रकरणी नागपूर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी नागपुरकरांकडून केली जात आहे. या घटनेची सध्या नागपूरमध्ये सगळीकडे चर्चा होऊ लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Vs England : शुभमन गिल ठरला नंबर १ कॅप्टन; सुनील गावसकर, विराट कोहलीलाही टाकलं मागे

Bhagavad Gita: भगवद्गीतेच्या नवव्या अध्याय कोणती शिकवण मिळते?

Badlapur News: बदलापूर रेल्वे स्टेशनला जुनेच सरकते जिने? प्रवाशांची फसवणूक, VIDEO

Pune : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या दारूड्या तरुणाला अटक, पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

Maharashtra Live News Update: भिमाशंकरला आदिती तटकरे नतमस्तक

SCROLL FOR NEXT