ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्ही अनेक सेलिब्रिटींकडून मॅनिफेस्टेशनबद्दल ऐकले असेलच.
सेलिब्रिटी लोक नक्की कशाबद्दल बोलत आहेत याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तर जाणून घ्या मॅनिफेस्ट करणे म्हणजे नक्की काय.
मॅनिफेस्ट करणे म्हणजे आपल्या विचार, भावना आणि विश्वासांद्वारे एखादी गोष्ट वास्तवात आणण्याची प्रक्रिया.जे तुम्ही मनात सतत पाहता, त्यावर विश्वास ठेवता ते प्रत्यक्षात आणणे.
म्हणजेच, जेव्हा तुम्हाला मनापासून आणि पूर्ण मनाने काहीतरी हवे असेल तेव्हा त्यावर विश्वास ठेवा आणि स्वतःला त्यासाठी पात्र बनवणे.असे केल्याने हळू-हळू आयुष्यात ज्या गोष्टी मनापासून हव्या आहेत त्या येवू लागतात.
मॅनिफेस्टशन ही "Law of Attraction" वर आधारित आहे .“Like attracts like” म्हणजेच तुम्ही जे व्हायचं ठरवता, तेच ऊर्जा म्हणून तुमच्याकडे परत येतं.
आत्मविश्वास वाढतो.आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो.तुमचे ध्येय अधिक स्पष्ट होते आणि मन:शांती आणि प्रेरणा मिळते.
स्वतःवर विश्वास ठेवा. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. दररोज सकारात्मक ऊर्जा अनुभवा आणि लहान गोष्टींसाठीही आभार माना.
जर तुम्ही दररोज विचार केला आणि वाटत असाल की "मला चांगली नोकरी मिळेल", आणि त्या दिशेने कठोर परिश्रम केले तर, ही तुमची मॅनिफेस्ट ऊर्जा बनते जी ती इच्छा पूर्ण करण्यास मदत करते.