Shreya Maskar
रानगाव बीच वसई-विरार प्रदेशात पालघर जिल्ह्यात आहे. हा शांत आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. येथे स्वच्छ वाळू पाहायला मिळते.
रानगाव बीचच्या परिसरात हिरवीगार झाडे पाहायला मिळतात. येथे प्रामुख्याने नारळाची झाडे आहेत.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथील सौंदर्य खुलते. तसेच पर्यटकांची गर्दी देखील पाहायला मिळते. फोटोग्राफीसाठी हे सुंदर लोकेशन आहे.
रानगाव बीचच्या जवळ अर्नाळा बीच आहे. येथे तुम्ही वीकेंडला पिकनिक प्लान करू शकता. वन डे पिकनिकसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
वसई रोड रेल्वे स्टेशन हे रानगाव बीचच्या जवळ आहे. तुम्ही स्टेशनला उतरून पुढे रिक्षाने बीचवर जाऊ शकता.
रानगाव बीचवरून सूर्योदय-सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. त्यामुळे येथील स्थानिक लोक फिरण्यासाठी आवर्जून येतात.
वसई आणि विरार येथील स्थानिक लोक येथे सायकलिंग आणि जॉगिंगचा आनंद घेताना दिसतात. सकाळी येथे फ्रेश हवा अनुभवता येते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.