File Photo
File Photo Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur News : नागपूर पोलिसांचा असाही प्रताप! दंडाची रक्कम वळवली आपल्याच खात्यात; स्वतःचा QR वापरुन...

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Vidarbha News : अनेकदा वाहतूक पोलीस सिग्नलवर उभे न राहता, झाडाच्या मागे उभे राहून नियम मोडणाऱ्यांना सोडण्यासाठी पैश्यांची मागणी करतात. मात्र, आता नागपूर पोलिसांनी वसुलीसाठी नवाच फंडा अवलंबला असल्याचे चित्र दिसून येत आहे. आधी पोलीस नियम मोडणाऱ्या वाहन चालकाला पकडतात आणि त्यानंतर त्याला स्वतःचा क्युआर कोड देत, चालानची रक्कम थेट स्वतःच्या खात्यात जमा करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

नागपुरात (Nagpur) दररोज विनाहेल्मेट वाहन चालविणे, सिग्नल तोडणे अशा विविध कारणांवरून शेकडो वाहन चालकांवर कारवाई केली जाते. यामध्ये शहरातील प्रत्येक चौकात किमान २० ते २५ चालान कारवाई होतात. वाहतूक पोलिसांना (Traffic Police) कारवाईसाठी एक डिव्हाईस देण्यात आले आहे.

त्याद्वारे वाहनावर किती चालान पेंडिंग आहेत याची माहिती मिळते. त्यानंतर चालान भरण्यासाठी डिव्हाईसवर एक ‘लिंक’ येते. त्या लिंकच्या माध्यमातून आलेला क्युआर कोड स्कॅन होताच, नागरिकांना चालान भरल्याचा संदेश मोबाईलवर येतो.

मात्र, नागपुरात काही पोलीस हे चालान भरताना, स्वतःच्या खात्याचा क्युआर कोड देत, ते पैसे आपल्या खात्यात वळवित असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कार्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे.

एका प्रकरणातून हा प्रकार उघडकीस

एका जणावर चालानची कारवाई करण्यात आली. या कारवाईत, त्याच्याकडून एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने ७६० रुपयांचे चालान वसूल केले. ते भरण्यासाठी त्याने स्वतःचा क्युआर कोड दिला. याशिवाय त्याची पावती तुम्हाला येईल असे सांगितले. मात्र, महिना झाला तरी, त्याची पावती मिळाली नाही. याबाबत वाहतूक विभागाकडे कळविले. मात्र, त्यांनी चालान व्ययक्तिकरित्या घेता येत नसल्याची माहिती दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamner Crime : नशेत मुलाने केला पित्याचा खून; दारूसाठी पैसे देण्यास वडिलांनी नकार दिल्याने कृत्य

Health Tips: जेवणानंतर तुम्हालाही आहे का चहा पिण्याची सवय? त्याआधी हे वाचाच

Relationship Tips : तुम्हीही लग्नासाठी उतावळे झालात; कमी वयात विवाह करण्याचे तोटे माहितीयेत का?

Manoj jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली; दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Cucumber Benefits: चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी रामबाण उपाय; एकदा करुन बघाच

SCROLL FOR NEXT