Rules Changes From 1st April: 1 एप्रिलपासून बदलणार 'हे' नियम; तुमच्या खिशावर थेट परिणाम होणार

New Rules : नवे नियम जाणून न घेतल्यास तुमचं बजेट बिघडणार
April New Rules
April New Rules Saam Tv
Published On

Rules Change In India: एप्रिल महिना सुरु होताच काही नवीन नियम लागू होणार करण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2023 पासून अनेक बदल होणार आहेत . ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे. 1 एप्रिल 2023 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होते. यामुळेच या महिन्यात अनेक गोष्टी बदल्या जातात. तर दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून अनेक नवे नियम लागू होतात. चला तर मग जाणून घेऊया 1 एप्रिलपासून कोणते नियम बदलत आहेत. (Latest Marathi News)

April New Rules
Mumbai Corona Update: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढणार, पालिका प्रशासनाचा इशारा

एलपीजी गॅसच्या किमती वाढू शकतात

एलपीजी (LPG) गॅसच्या किमती दर महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलल्या जातात. मात्र, काही वेळा शासनाकडून त्यात कोणताही बदल केला जात नाही. १ एप्रिलपासून एलपीजीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. त्यानंतर 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 350 रुपयांनी वाढली आहे.

वाहने महाग होतील

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला वाहन खरेदी करणे महाग होऊ शकते. नवीन उत्सर्जन मानकांमुळे कंपन्यांच्या खर्चात वाढ होणार असून, त्यामुळे वाहनांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हॉलमार्किंगशी संबंधित नियमात बदल होणार

1 एप्रिलपासून देशभरात फक्त सहा अंकी 'हॉलमार्क अल्फान्यूमेरिक युनिक आयडेंटिफिकेशन' क्रमांक असलेले सोनेच विकले जाईल. म्हणजेच 31 मार्चनंतर सोनार (Gold) जुने हॉलमार्क असलेले दागिने विकू शकणार नाही.

April New Rules
UPI Payment Charges: 1 एप्रिलपासून GPay, Phonepe महागणार! या पेमेंटवर भरावा लागणार अतिरिक्त शुल्क

विमा पॉलिसीवर कर लागणार

2023 च्या अर्थसंकल्पात घोषणा केल्यानुसार विम्याचा वार्षिक प्रीमियम 5 लाखांपेक्षा जास्त असल्यास त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकरण्यात येणार आहे. आतापर्यंत विम्याचे नियमित उत्पन्न हे पूर्णपणे करमुक्त असायचे मात्र 1 एप्रिलपासून या नियमात बदल करण्यात येणार आहे.

एलपीजी, सीएनजी, पीएनजीच्या दरात बदल

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोलियम कंपन्या तेलाच्या किंमतींमध्ये बदल करतात. यामुळे यावेळी तेलाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

डिमॅट अकाउंटमध्ये नॉमिनी आवश्यक

डिमॅट अकाउंटमध्ये नॉमिनी ठेवणं आवश्यक असणार आहे. या नामांकनाची अंतिम मुदत 31 मार्च 2023 आहे. तुम्ही नॉमिनी न ठेवल्यास 1 एप्रिलपासून ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट गोठावलं जाईल.

April New Rules
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरात रात्री दोन गटात तुफान राडा, पोलिसांच्या गाड्या जाळल्या; गोळीबारात एक जखमी

एप्रिल 2023 मधील बँकांच्या सुट्ट्या

एप्रिल महिन्यात बँकांना तब्बल 15 दिवस सुट्ट्या असणार आहे. सात विकेंडच्या सुट्ट्या आणि आंबेडकर जयंती, महावीर जयंती, ईद अशा सुट्ट्यांमुळे बँक 15 दिवस बंद असेल.

NSE वरील व्यवहार शुल्कात 6 टक्के वाढ मागे घेणार

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) ने यापूर्वी कॅश इक्विटी आणि फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेगमेंटमधील कोणत्याही प्रकारच्या व्यवहारांवर 6 टक्के शुल्क आकारले होते. 1 एप्रिलपासून हे शुल्क मागे घेतले जाणार आहे. यापूर्वी जानेवारी 2021 मध्ये हे शुल्क सुरू करण्यात आले होते.

April New Rules
UPI Scam Alert : PhonePe, Google Pay वापरकर्त्यांनो सावधान! एक क्लिक अन् लाखोंचा गंडा...

दिव्यांगजनांसाठी UDID असेल अनिवार्य

17 सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांना 1 एप्रिलपासून केंद्राकडून जारी केलेले युनिक आयडेंटिफिकेशन कार्ड (UDID) क्रमांक अनिवार्यपणे द्यावा लागेल. सरकारने म्हटले आहे की ज्यांच्याकडे यूडीआयडी कार्ड नाही त्यांना अपंगत्व प्रमाणपत्रासह यूडीआयडी नोंदणी क्रमांक (केवळ यूडीआयडी पोर्टलवरून तयार केलेला) द्यावा लागेल.

जास्त प्रीमियम असलेल्या विमा पॉलिसींवर कर भरावा लागेल

तुम्ही 5 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक प्रीमियम पॉलिसी खरेदी करणार असाल तर तुमच्या खिशावर ताण येऊ शकतो. 1 एप्रिल 2023 पासून वार्षिक 5 लाख रुपयांपेक्षा जास्त प्रीमियम असलेल्या विमा योजनेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com