Mumbai Corona Update: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढणार, पालिका प्रशासनाचा इशारा

Mumbai Covid Positive Cases : केईएम, शीव, नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांसह महत्त्वाच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये 4 हजार बेड ऑक्टिव्ह करण्यात येणार आहे.
Mumbai Corona Update
Mumbai Corona UpdateSAAM TV
Published On

Mumbai Covid-19 News : मुंबईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत एप्रिल आणि मेअखेरपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या वाढणार असल्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. या पर्श्वभूमीवर 1 एप्रिलपासून सर्व 24 वॉर्डमध्ये 'वॉर्ड वॉर रूम' पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

रुग्णांची संख्या वाढण्याचा इशारा देण्यासोबत प्रशासनाकडून त्या पार्श्वभूमीवर तयारी देखील करण्यात येत आहे. केईएम, शीव, नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांसह महत्त्वाच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये 4 हजार बेड ऑक्टिव्ह करण्यात येणार आहे. तसेच खासगी रुग्णालयांमध्ये 10 टक्के बेडचे 'कोविड वॉर्ड' तैनात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Mumbai Corona Update
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरात रात्री दोन गटात तुफान राडा, पोलिसांच्या गाड्या जाळल्या; गोळीबारात एक जखमी

याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड बेडसह ऑक्सिजन बेड, आयसीयू, व्हेंटिलेटर अशा सर्व प्रकारचे बेड तैनात ठेवण्यात येणार आहेत. आरोग्यतज्ञांचा अंदाज आणि मागील कोरोना लाटांचा अनुभव पाहता पुढील 2 महिने कोरोना रुग्णवाढ होण्याची शक्यता असल्याचे महापालिका प्रशनासानाने म्हटले आहे. (Latest Marathi News)

Mumbai Corona Update
Karnataka C-Voter Survey : कर्नाटकात भाजपला धक्का! सी व्होटरच्या सर्व्हेत काँग्रेसची जोरदार मुसंडी

राज्यात कोरोना रुग्णांची वाढ

दरम्यान राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याची परिस्थिती आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दिवसभरात 483 नव्या रुग्णांची भर पडली असून 317 रुग्ण बरेही झाले. बुधवारी राज्यात तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या कोरोनाबाधित रुग्णांचा रिकव्हरी रेट 98.15 टक्के आहे, तर मृत्यूचा दर 1.82 टक्के आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com