Karnataka C-Voter Survey : कर्नाटकात भाजपला धक्का! सी व्होटरच्या सर्व्हेत काँग्रेसची जोरदार मुसंडी

Karnataka Assembly Election: कर्नाटक विधानसभेसाठी 10 मे रोजी मतदान पार पडेल तर 13 मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
Karnataka C-Voter Survey
Karnataka C-Voter Surveysaam tv

Karnataka Assembly Election Update: कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. कर्नाटक विधानसभेसाठी एका टप्प्यात निवडणूक होणार असून 10 मे रोजी मतदान पार पडेल तर 13 मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता भाजप आणि काँग्रेससह सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.

परंतु या निवडणुकीआधी भाजपचं टेंशन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कर्नाटक विधानसभेत एकूण 224 जागा आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी 113 हा जादुई आकडा गाठावा लागणार आहे. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ABP आणि C-Voter संस्थेने त्यांचा निवडणूकपूर्व सर्व्हे (C-Voter Survey) जाहीर केला आहे. या सर्व्हेत भाजपला जोरदार धक्का बसला आहे.

Karnataka C-Voter Survey
Raj Thackeray News : मनसैनिकांकडून राम नवमी धडाक्यात; मात्र राज ठाकरे परदेशात, राजकीय वर्तळात चर्चांना उधाण

ABP आणि C-Voter च्या या सर्व्हेनुसार कर्नाटकात काँग्रेस जोरदार मुसंडी मारू शकते आणि पक्षाला 115 ते 127 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काँग्रेसचा हा आकडा बहुमताला पार करणारा आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमद्ये उत्साह संचारला आहे.

दुसरीकडे भाजपला ला या सर्व्हेत जोरदार धक्का बसला आहे. भाजपला 68 ते 80 जागांवरच समाधान मानावे लागणार असल्याची शक्यता आहे. याशिवाय कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या जेडीएस पक्षाला 23 ते 35 जागा मिळण्याची शक्यता या सर्व्हेत वर्तवण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Karnataka C-Voter Survey
Todays Horoscope In Marathi : या राशीचा खिसा रिकामा होणार, वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता

दरम्यान 2018 च्या निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट झाली होती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या झंझावाती सभांनतरही येडियुरप्पा भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. गेल्यावेळी झालेल्या या निवडणुकीत भाजपला 104 जागा मिळाल्या, तर काँग्रेसला 78 जगांवर समाधान मानावे लागले होते. याशिवाय जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या.

या सर्व्हेमुळे कर्नाटकात सत्ताबदलाचा ट्रेंड कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता कर्नाटकमध्ये सत्तेवर असलेला भाजप आपली सत्ता राखण्यास यशस्वी होते की सत्तापालट होऊ काँग्रेस सत्तेत येणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. कारण लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारी ही निवडणूक भाजपसाठी आणि विरोधी पक्षांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com