Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

आंघोळ करताना आक्षेपार्ह व्हिडिओ शूट अन् ब्लॅकमेल, तरूणीच्या मित्रानेच असं का केलं? | Nagpur Crime

Nagpur Shocker: नागपूरमध्ये विद्यार्थिनीचा आंघोळीचा व्हिडिओ शूट करून व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी १५ तासांत कारवाई केली.

Bhagyashree Kamble

विद्यार्थीचा आंघोळीचा आक्षेपार्ह व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही धक्कादायक घटना नागपुरातून उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपीच्या धमक्यांना कंटाळून पीडितेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

नागपुरातील सदर पोलीस स्टेशन परिसरात हा प्रकार घडला. पीडित विद्यार्थीनी आंघोळ करत होती. आंघोळीदरम्यानचा आक्षेपार्ह व्हिडिओ आरोपीने शूट केला. नंतर या व्हिडिओचा वापर करून तो पीडितेला ब्लॅकमेल करत होता. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. याच त्रासाला कंटाळून पीडितेनं पोलीस ठाणे गाठले.

पोलीस ठाण्यात पीडितेनं आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्राराची गंभीर दखल घेत आरोपींच्या तपासात पोलीस पथक रवाना झाले. पोलिसांनी तपास करत सतीश दासर या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. १५ तासात त्याच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र देखील दाखल केले.

दरम्यान, पोलीस तपासात आरोपी हा विद्यार्थीनीचा जुना मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला त्रास देण्यासाठी तिचा आंघोळ करताना आक्षेपार्ह व्हिडिओ शूट करून पीडितेला पाठवला. यानंतर तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. दरम्यान पोलीस आरोपीची चौकशी करत असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whatsapp: व्हॉट्सॲपच्या ३ अब्ज युजर्सवर मोठं संकट, नव्या टूलने वाढवलं टेन्शन; तुमच्या मोबाइलवर ठेवतंय लक्ष

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Shirala Chutney Recipe : शिराळ्याची चटणी कधी खाल्ली आहात का? हिवाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला उत्तम

Pune : पुण्यात शरद पवारांना जबरी धक्का, आमदाराचा मुलगा भाजपात प्रवेश करणार, २२ नेते आज कमळ हातात घेणार

Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आमिर खानच्या सिनेमात वर्णी

SCROLL FOR NEXT