नागपूर दंगलीमध्ये जे लोक सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जे लोक जाळपोळ करण्यात सहभागी असतील, त्यांच्याकडून नुकसान भरपाई घेतली जाईल. जर त्यांनी नुकसान भरपाई दिली नाही, तर त्यांची मालमत्ता जमा केली जाणार,असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज नागपूरमधील दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी पोलीस आयुक्त रेंज आयजी उपस्थित होते.
पाहणी केल्यानंतर हिंसाचार प्रकरणी काय कारवाई करण्यात आली याचा आढावा फडणवीसांनी घेतला. पोलिसांसोबत झालेल्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
नागपूरमधील महाल भागात दोन गटात दंगल उसळली होती. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी ताबोडतोब कारवाई केली. दंगलीमागील मास्टरमाईंड असलेल्या फहीम खानला पोलिसांनी अटक केली आहे. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती दिली, तसेच दंगल का उसळली याची माहिती दिली.
औरंगजेबची कबर जाळण्यात आली, त्यावर पोलिसांनी तक्रार दाखल केलीय. नागपूर शहरात अफवेमुळे दंगल उसळल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट प्रसारित झाल्या. कुराण आयत असलेल्या चादरी जाळण्यात आल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याने दंगल घडल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, पोलिसांनी जवळपास चार-पाच तासात दंगलीला आवर घातला, प्रतिबंधात्मक कारवाई केली. सर्व सीसीटीव्ही जे दंगेखोर दिसत आहे, त्यांना अटक केली जातेय. आतापर्यंत करण्यात आलेल्या १०४ लोकांमध्ये १२ जण अल्पवयीन आहेत. यात अजून ओळख पटवणे सुरू आहे, यापेक्षा जास्त लोकांची अटक होण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी वर्तवलीय. जो जो व्यक्ती तोडफोड करताना दिसतो त्यावर कारवाई होईल, असं फडणवीस म्हणाले.
सोशल मीडिया तपासले जात आहे. दंगा भडकवणारे पोस्ट ज्यांनी टाकले त्यांना सहआरोपी बनवले जाणार आहे. सोशल मीडियावरील ६८ पोस्ट तपासून डिलीट करण्यात आल्या. त्याबाबत अजून तपास सुरू आहे. माथी भडकवणारे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या सर्व लोकांवर कारवाई होणार आहे. दंगलीत झालेली नुकसान भरपाई येत्या ३ ते ४ दिवसात दिली जाईल.
दंगलीमुळे शहरातील काही भागात निर्बंध घालण्यात आली आहेत. जनजीवन व्यापार यावर परिणाम झाला आहे, यात लवकरत लवकर शिथिलता आणली जाणार आहे. नुकसान भरपाईची वसुली दंगेखोरांकडून केली जाणार आहे. वसुली करू न दिल्यास त्यांची प्रॉपर्टी विकू,असं फडणवीस म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.