नागपुरात एका तासात 110 मिलिमीटर पाऊस
सोमलवार शाळेत 800 विद्यार्थी पाण्यात अडकले
नागपुरात मुसळधार पावसामुळे 3 ते 4 फूट पाणी
नागपूरमध्ये तुफान पाऊस होत असून प्रतापनगरमधील सोमलवार शाळेतील मैदानात पाणी साचलंय. शाळा सुरू असून मैदानात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांचे हाल होऊ लागलेत. परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्याने पाणी या भागात चांगलेच पाणी साचलंय. शहरात सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या होत्या. काही वेळाने मात्र पावसाचा जोर वाढला.
गेल्या अडीच तासांपासून सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे शहरात दाणादाण उडाली. अनेक भागांत सध्या पावसाचे पाणी साचलंय. तर काही ठिकाणी गुडघ्यांपर्यंत पाण्याचा प्रवाह पाहायला मिळतोय. सोमलवार निकालास आणि सोमलवार खामला या दोन प्रमुख शाळांच्या परिसरात 3 ते 4 फूट पाणी साचल्याने शाळेत उपस्थित असलेल्या जवळपास 800 विद्यार्थी अडकलेत.
हवामान विभागाने सुरुवातीला येलो अलर्ट दिला होता मात्र अचानकपणे कन्व्हर्ट झाला आणि अवघ्या एक ते दीड तासांमध्ये 110 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचं मनपा आयुक्त डॉक्टर बिपिन इटनकर यांनी सांगितलं. या कामाची सुद्धा पाहणी केली होती मात्र लवकरात लवकर हे काम करण्यासंदर्भात आदेश देण्यात येईल नेमकी काय चूक झाली ते सुद्धा तपासले जाईल.
शहरातील लो लाईन एरिया मध्ये मुसळधार पाऊस झाल्याने पाणी साचला आहे त्या त्या ठिकाणी पंपिंग करून पाणी काढण्याचं काम सुरू आहे. पुढील दोन दिवस ऑरेंज कलर देण्यात आलेला आहे त्यामुळे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आले आहे. उद्या शाळेला सुट्टी द्यायच्या संदर्भात संध्याकाळपर्यंत निर्णय घेतला जाईल अशी माहिती मनपा आयुक्त विपीन इटनकर यांनी दिली आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील नामांकित सोमलवार शाळेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप आलंय. दुसरीकडे खामला परिसरातील शाळेत परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. खामला भागातील शाळेच्या आवारात आणि मैदानात तब्बल साडेतीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचलंय. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील नामांकित सोमलवार शाळेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप आले आहे. दुसरीकडे खामला परिसरातील शाळेत परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती.
या भागात पाऊस साचल्याने लोकांना ये-जा करायला त्रास होतोय. लोक त्या भागात लावण्यात आलेल्या दोऱ्यांच्या मदतीने चालण्याचा प्रयत्न करत आहेत. आज पावसाचा येलो अलर्ट असल्याने दुपारी चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय. हीच शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय.
सोमलवार शाळेचे प्राचार्य यांनी साम टीव्ही बोलताना सांगितले की या सगळ्या संदर्भात महानगरपालिका अगोदरच कळवलं होतं. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि याचा फटका पालकांना बसला आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अडकून बसले. जवळपास अडीच हजार विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत असल्याचा प्राचार्य यांनी सांगितलं. जवळपास अर्ध्या विद्यार्थ्यांना काढण्यात आलं मात्र अजूनही विद्यार्थी हे शाळेतच अडकून पडलेले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.