Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News : पोहोयला गेले अन् घात झाला; नागपुरात चार विद्यार्थ्यांचा कालव्यात बुडून मृत्यू, कुटुंबांवर शोककळा

4 students drown at nagpur : नागपुरातील चार विद्यार्थ्यांचा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थ्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

नागपूर : नागपुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरमधील ४ शालेय विद्यार्थी मोठ्या कालव्यात बुडाल्याची घटना घडली आहे. चार विद्यार्थ्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागूपर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील घोटीटोक परिसरातील ४ शालेय विद्यार्थ्यांचा कालव्यातून बुडून मृत्यू झाला आहे. सर्व विद्यार्थी इयत्ता सातवी ते अकराव्या वर्गातील असून इंदिरा गांधी मुलांचे वस्तीगृहाचे विद्यार्थी आहेत. कालव्यात पोहोयला गेले असता ही दुर्घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस आणि तहसीलदार पोहचले असून शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. या चार जणांचे मृतदेह शोधण्याचे कार्य सुरु आहे.

नेमकं काय घडलं?

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात बोरी गावाजवळ चार शाळकरी मुलं कालव्यात बुडाली आहेत. बोरी गावाजवळ इंदिरा शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील आठ विद्यार्थी आज दुपारी शाळेजवळच्या कालव्यावर पोहायला गेले होते. आठ पैकी चार मुलं पाण्यात उतरले. मात्र, तेव्हा कालव्यामध्ये पाण्याचा प्रवाह तीव्र होता. या पाण्यात ते स्वतःला सावरू शकले नाहीत. पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले. अद्याप एकही मुलाचा पत्ता लागू शकलेला नाही.

कालव्यात बुडालेले सर्व विद्यार्थी इयत्त सातवी ते अकरावी वर्गादरम्यानचे असल्याची माहिती आहे मिळाली आहे.चौघेजण पाण्याच्या प्रवाहात बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले आहेत. चारही मुलांचा शोध सुरू आहे. मात्र त्यात यश मिळालेले नाही.

गोदावरी नदीत चार जण बुडाले

नगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर येथे दुचाकीवरील चार जण गोदावरी नदीपात्रात बुडाल्याची घटना ११ ऑक्टोबर रोजी घडली. यातील मच्छिंद्र बर्डे याला वाचवण्यात स्थानिक मच्छिमारांना यश आले होतं. तर येनुबई बर्डे या महिलेचा मृतदेह आढळला होता.

दिलीप बर्डे आणि रवी मोरे हे दोघेजण बेपत्ता असल्याने संभाजीनगर येथील अग्निशमन दलातील जवानांकडून दोन दिवसांपासून गोदावरी नदीपात्रात शोध मोहीम सुरू होती. अखेर काल सायंकाळी बेपत्ता दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. या घटनेत गोदावरी नदीत बुडालेल्या चार पैकी तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कमालपूर गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

SCROLL FOR NEXT