Nagpur Rain Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Rain: विदर्भात पुढील 3 दिवस वादळी पावसाचा अंदाज, नागपूर वेधशाळेने व्यक्त केला अंदाज

Vidarbha Weather News: अमरावती, वर्धा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता

Shivani Tichkule

Nagpur Rain Update: उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच आता विदर्भकरांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण विदर्भातील काही भागांमध्ये पुढील तीन दिवस वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अमरावती, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर वेधशाळेने असा अंदाज व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

पुढील तीन दिवसांत विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोबतच विजांच्या कडकडाटासह जोरदार वारेही वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उकाड्यापासून हैराण असलेल्या विदर्भकरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. त्यासोबतच नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन देखील हवामान विभागाने केलं आहे. (Nagpur Rain)

मान्सून ४८ तासात केरळात दाखल होण्याची शक्यता?

पुढील ४८ तासात मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा मॉन्सून केराळत दाखल होण्याची वेळ लंबली असली तरी आता मॉन्सूनच्या वाटचालीस आता वेग आला आहे.

पुढील ४८ तासांमध्ये मॉन्सून (Monsoon) केरळ मध्ये दाखल होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार ४ जून पर्यंत मॉन्सून केरळात येणार होता. प्रत्यक्षात मात्र त्यास आणखीन थोडा विलंब झाला. सध्या अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकले.

त्यामुळे केरळमध्ये मॉन्सूनला दाखल होण्यासाठी येत्या उशीर झाला. शुक्रवारपर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हळूहळू देशात मॉन्सूनचा प्रवास सुरू होणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसची 'वंचित'ला निवडणुकीसाठी साद; प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार? VIDEO

भारतातही 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी? कारण काय? VIDEO

Saturday Horoscope : येत्या काही दिवसांत मोठं काही तरी घडणार; 5 राशींच्या लोकांचे आयुष्य आनंदाने फुलून जाणार

Pune Politics : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती फिस्कटली? पुण्यात नेमकं काय घडलं?

Syria Masjid Blast : मशिदीत नमाजावेळी बॉम्बस्फोट; 12 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT