Railway Police Launch Operation Matrushakti Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur: मुकबधीर महिलेला धावत्या रेल्वेत प्रसुती कळा; खाकी वर्दीतल्या देवमाणसांनी लाँच केलं 'ऑपरेशन मातृशक्ती'

Railway Police Launch Operation Matrushakti : धावत्या रेल्वेमध्ये एका मुकबधीर असलेल्या महिलेलेने बाळा जन्म दिल्याची घटना घडलीय. रेल्वे पोलिसांनी केलेल्या ऑपरेशन मातृशक्ती लाँचमुळे खाकी वेशातील देव अनेकांना पाहायला मिळाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसाद जगताप, साम प्रतिनिधी

नागपूर: रेल्वे पोलिसांनी लाँच केलेल्या 'ऑपरेशन मातृशक्ती'मुळे खाकी वेशातील देव अनेकांना पाहायला मिळाला. ही घटना घडलीय नागपूर रेल्वे स्टेशनवर. एका महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्या, परंतु महिलेला बोलता येत नसल्याने तिला होणारा त्रास ती कोणाला सांगू शकत नव्हती. आपलं काय होणार? बाळाचं काय होणार? अशा विचारात वेदना सहन करणाऱ्या महिलेसमोर खाकी वर्दीतील देव अवतरले. पोलिसांनी वेळीच 'ऑपरेशन मातृशक्ती' लाँच करत महिलेसह बाळाला जीवनदान दिलं.

धावत्या रेल्वेत एका बोलता न येणाऱ्या माऊलीला प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या.तिला काय होतंय? हे तिला कुणाला सांगताही येत नव्हतं.. रेल्वेचा वेग, लोकांची लगबग आणि तिच्या शरीरात होणारे बदल पाहून तिच्या काळजाचा थरकाप उडत होता. आता काय होईन? या कळा कशा आणि कधी थांबतील. जन्माला येणारं बाळ कुठे जन्म घेईन? अशा विचारत पडलेल्या या महिलेसाठी पोलिसांनी थेट ऑपरेशन मातृशक्ती लॉंच केलं आणि महिलेला वेळीच रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांच्या या तत्परचेचं आणि त्यांनी चालवलेल्या 'ऑपरेशन मातृशक्तीचं' आता सर्वत्र कौतूक होतंय.

या घटनेने या जगात आजही माणुसकी शिल्लक आहे याची प्रचिती झाली. वेदनांना दत्तक घेऊन, संवेदना जागणारी माणसं आजही आपल्या अवतीभोवती आहेत, हे या घटनेतून समोर आलं आहे. दरम्यान ही घटना नागपूर रेल्वे स्थानकावर गोंदियावरुन नागपूरला येणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये हा सगळा प्रकार घडलाय. या रेल्वे गाडीत असलेल्या एका मुकबधिर महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्या.

ही माहिती एका भल्या माणसाने रेल्वे पोलिसांपर्यंत पोहचवली. ही माहिती मिळताच कामठी स्टेशनवरचे पोलीस अलर्ट झाले. पोलिसांनी या महिलेसाठी तात्काळ ऑपरेशन मातृशक्ती लॉंच केलं. काही क्षणात प्लॅटफॉर्मवर गाडी थांबली आणि पोलीस या महिलेच्या मदतीला धावले.

पोलिसांनी महिलेला उचलून तात्काळ धाव घेतली. त्यांनी रिक्षा बोलवत महिलेला तातडीने रुग्णालयात दाखलं केलं. या घटना सीसीटीव्ही कैद झाली असून त्याचा व्हिडिओज् सोशल मीडियावर व्हायरल झालेत. पोलिसांच्या खाकी वर्दीमागे एक हळवा आणि संवेदशील माणूस असतो. जो लोकांच्या मदतीला असा धावून जातो, याची प्रचिती या घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलीय. पोलिसांच्या या तत्परचेचं आणि त्यांनी चालवलेल्या 'ऑपरेशन मातृशक्तीचं' आता सर्वत्र कौतुक होतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : एकीकडे धो धो पाऊस, दुसरीकडे तारामधून ठिणग्या अन् जाळ; मावळमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Live News Update: देवव्रत यांनी घेतली महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ

Heavy Rain : संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; दोन दिवसात १० मंडळामध्ये अतिवृष्टी, शेतातील कांदा गेला वाहून

Google Gemini Photos: रेट्रो लूक करायचाय? पण जमतच नाही; हे 10 Prompt वापरा अन् ट्रेडिंगमध्ये राहा

Kumbha Rashi: पैशांचे संकट दूर होणार का? जाणून घ्या कुंभ राशीचे सोमवारचे भविष्य

SCROLL FOR NEXT