Wardha News : वादळी वाऱ्याने भिडी रेल्वे स्थानकाचे उडाले पत्रे; नुकतंच झालं होतं स्टेशन आणि मार्गाचं उद्घाटन

Bhidi Railway Station : वर्धा नांदेड रेल्वे मार्गवरील भिडी रेल्वे स्थानकच्या शेडचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडाले आहेत. वर्धा ते कळंबपर्यंत रेल्वे स्टेशनचं आणि मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच ई लोकार्पण करण्यातं आलं होतं.
Wardha News
Wardha NewsSaam Digital
Published On

वर्धा नांदेड रेल्वे मार्गवरील भिडी रेल्वे स्थानकच्या शेडचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडाले आहेत. वर्धा ते कळंबपर्यंत रेल्वे स्टेशनचं आणि मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच ई लोकार्पण करण्यातं आलं होतं. वादळामुळे भिडी रेल्वे स्थानकावरील टीनपत्रे उडाले असून दीड महिन्या पूर्वी केलेल्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय नसल्याने प्रवासी वर्गामध्ये रोष व्यक्त होत आहे. त्यातच टिन पत्रे सुद्धा उडून गेले असल्याने प्रवाशांनी उन्हाच्या वेळेस जायचे कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वर्धा नांदेड या मार्गाचं काम अद्याप पूर्ण झाले नसले तरी वर्धा ते कळंब या मार्गांवर प्रवासी गाडी सुरु करण्यात आलीय. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या मार्गाचं लोकार्पण करण्यात आलं. या मार्गांवरील भिडी रेल्वे स्थानकावर वादळी वाऱ्यामुळे रेल्वे स्थानाकावरील शेडचे पूर्ण टिनपत्रे उडालीय. टिनपत्रे उडल्याने रेल्वेस्थानाकर प्रवाश्यांना उन्हात उभे रहावे लागणार आहे. वादळी वाऱ्यामुळे झालेल्या या घटनेवेळी सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाहीय.

रेल्वे स्थानकावर पाण्यासाठीही वणवण

वर्धा-नांदेड रेल्वे मार्ग सुरू झाला; पण अद्यापही अपूर्ण झाल्याने रेल्वे स्थानकावर मात्र सुविधांचा अभाव असून स्थानकावर पिण्याचे पाणीच मिळत नसल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर स्थानकावरील शौचालये देखील पाण्याअभावी कोरडेठाक पडले आहेत.भिडी हे वर्धा-नांदेड मार्गावरील वर्ध्यावरून तिसऱ्या क्रमांकाचे रेल्वेस्थानक आहे.

Wardha News
Vidharbha Weather Alert: विदर्भ तापला! अंगातून घामाच्या धारा...घराबाहेर पडणं मुश्किल, हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा

या मार्गाचे काम अपूर्ण झाल्याने वर्धा-नांदेड रेल्वे ही फक्त कळंबपर्यंतच सुरू करण्यात आली आहे. सध्या या रेल्वेस्थानकावर प्रवाशांची वर्दळ कमी आहे. पुढे ही सेवा नांदेडपर्यंत सुरळीत झाल्यास प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू राहणार आहे. सध्या भिडी रेल्वेस्थानकावर पाण्याची समस्या गंभीर आहे. ती तत्काळ सोडवावी, अशी मागणी केली जात आहे.

Wardha News
Nashik News : पाय घसरून विहिरीत पडली ३ वर्षांची चिमुकली; वाचवण्यासाठी आईनेही घेतली उडी: दोघींचाही बुडून मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com