Nagpur Aarati Gurav Death
Nagpur Aarati Gurav Death Saam TV
महाराष्ट्र

Nagpur News : भयंकर! हेडफोन लावून रेल्वेरुळ ओलांडणं बेतलं जीवावर; ट्रेनच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : टेक्नॉलॉजीमुळे मानवाचं जीनव काहीसं सोपं झालं आहे. अनेक गॅजेटमुळे आपली कामं सोपी होतात, मनोरंजन होतं. मात्र माणसांकडून टेक्नॉलॉजीच्या चुकीच्या वापरामुळे दुष्परिणामही भोगावे लागत आहे. अशीच एक घटना नागपुरातून समोर आली आहे. हेडफोन लावून रस्त्याने जाणाऱ्या एका तरुणीचा ट्रेनच्या (Train) धडकेत मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

ही दुर्देवी घटना बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास डोंगरगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ घडली. आरती मदन गुरव असं मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थीनीचं नाव आहे. आरती ही मूळ भंडारा जिल्ह्यातील सातोना या गावची निवासी आहे. ती डोंगरगाव जवळील वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयात बीई प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती.

बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास आरती नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाली होती. दरम्यान, कानात हेडफोन लावून रेल्वेरूळ क्रॉस करत असताना, पाठीमागून येणाऱ्या ट्रेनचा आवाज आरतीला आला नाही. क्षणात काही समजण्याच्या आतच ट्रेनने तिला जबर धडक (Accident) दिली.

धडक इतकी भीषण होती की, आरती ट्रेनखाली आली. या भयंकर घटनेत आरतीच्या चिंधड्या उडाल्या. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरतीचा मृतदेह ताब्यात घेतला. नेहमी हसत-खेळत राहणारी आरती अचानक निघून गेल्याने तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup 2024 | टी-२० वर्ल्डकप सुरू होण्याआधीच धडकी भरवणारी बातमी! दहशतवादी हल्ल्याची धमकी

Nana Patole On Narendra Modi | अग्निवीर योजनेबद्दल नाना पटोले काय बोलले?

Hapus Mango : देवगडचा की दक्षिण भारतातला? खरा हापूस आंबां कसा ओळखायचा?

Kalyan Lok Sabha Election: उद्धव ठाकरे यांनी अर्ज मागे घ्यायला सांगितला म्हणून अर्ज मागे घेतला - रमेश जाधव

Loksabha Election: हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी शांत करण्यात भाजपला यश; दिंडोरी मतदारसंघात भारती पवारांना दिलासा

SCROLL FOR NEXT