Viral Video: किंग कोब्रासोबत खेळणं पडलं महागात; शेपटीला हात लावताच उलट फिरून फणा काढला अन्...

एक माणूस चक्क किंग कोब्राला पकडण्याचा प्रयत्न करत आहे.
Viral Video
Viral VideoSaam TV

Viral Video: साप दिसताच सर्वांना पळता भुई थोडी होते. सपांमध्ये सर्वात खतरनाक आणि विषारी साप म्हणून किंग कोब्राला ओळखले जाते. या सापाचा एक दंश माणसाला जागीच ठार करू शकतो. अशात सोशल मीडियावर नेहमीच अनेक अतरंगी व्हिडिओ व्हायरल होतं असतात. अनेक सर्प मित्र सापाला खूप सहज पकडतात. मात्र किंग कोब्रा दिसल्यावर असे धाडस करण्यासाठी भलेभले घाबरतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतं आहे. यामध्ये एक माणूस चक्क किंग कोब्राला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला पाहून सर्वांच्याच अंगावर शहारे येत आहेत. (Latest Viral king cobra News)

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हा किंग कोब्रा काही साधा सुधा किंवा लहान नाही. जवळपास १० फूट लांबीचा हा कोब्रा आहे. एका गावात तो अडकला आहे. त्याला पाहण्यासाठी सर्वांनी गर्दी केली आहे. अशात किंग कोब्रा त्याच्या मार्गाने जात असताना एक पठ्ठ्या थेट समोर येतो आणि किंग कोब्राच्या शेपटीला पकडतो. सुरुवातीला कोब्रा शांत असतो. मात्र माणसांची एवढी गर्दी झालेली असते की तो देखील जीव मुठीत घेऊन पळ काढत असतो.

Viral Video
Viral Video : वेड लागलं, लागलं... धावत्या स्कुटीवर बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून गर्लफ्रेंडचा रोमान्स

अशात कोब्राला तो माणूस त्रास देत असल्याने तो देखील भडकतो आणि थेट त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. किंग कोब्राची शेपटी पकडताच तो उलट फिरतो आणि त्या व्यक्तीवर फणा काढतो. हे पाहून सगळेच घाबरतात. मात्र हा व्यक्ती किंग कोब्राच्या डोळ्यात बघतो आणि कोब्रा शांत होतो. त्यावर हा व्यक्ती पुन्हा एकदा खोडसाळपणा करतो आणि सापाची शेपटी पकडून त्याच्या पाठीला हात लावतो. पुन्हा तसचं होतं. किंग कोब्रा पुन्हा फणा काढतो. तिसऱ्यांदा मात्र किंग कोब्रा चांगलाच खवळतो. त्या माणसाने शेपटीला हात लावताच तो उलटा फणा काढतो आणि त्याच्या दिशेने सरपटू लागतो.

यावेळी तो व्यक्ती देखील घाबरतो आणि आणि त्याला सोडून देतो. त्यानंतर किंग कोब्रा थेट जंगलात जाताना दिसत आहे. @the_king_of_snake या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आता पर्यंत या व्हिडिओला जवळपास ८ लाख ९४ हजारांच्या घरात व्हुव्ज मिळाले आहेत. नेटकरी माणसाने केलेल्या कृत्याने त्याच्यावर टीका करत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या या व्यक्तीचे नाव हरीश असे आहे. त्याची करामत पाहून यूजर्स त्याला स्वतःची काळजी घेण्यास सांगत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com