Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News : ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची मतमोजणीसाठी काँग्रेसच्या उमेदवाराने भरले तीन लाख रुपये; प्रशासनावरही केला गंभीर आरोप

Nagpur News : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यभर ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे.

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 
नागपूर
: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. या निकालानंतर ईव्हीएम मशीनवर विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आले आहेत. ईव्हीएम मशीनचा हा घोळ अजूनही थांबलेला नसून यात आता नागपूरमधील काँग्रेसच्या उमेदवाराने ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची मतमोजणी करण्यासाठी टन लाख रुपये भरले आहेत.   

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यभर ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे. दरम्यान काँग्रेसचे दक्षिण नागपूरचे (Nagpur) उमेदवार गिरीश पांडव यांनी सात बुथवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची झालेला मतदानची आकडेवारी जुडवून द्यावी; अशा मागणीसह तीन लाख रुपये भरले आहे. मोठ्या प्रमाणात फिजिकली लोक उभे करून मतदार यादीमध्ये बोगस नाव, बोगस आधार कार्ड तयार करून मतदान (Vidhan Sabha Election) झालं. या सगळ्यांमध्ये प्रशासनही सहभागी असल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांनी केला आहे.

विजयाची खात्री 
विधानसभा निवडणुकीमधील ईव्हीएम निकालात घोळ झालेला आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली होती. यामुळे सर्वसामान्य जनतेला विजयाची खात्री होती. ओबीसी बहुल भागामध्ये बोगस मतदान झाल्याची शंका असून मी माझ्या जनतेच्या आणि कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून व्हीव्हीपॅटच्या मोजणीसाठी ७ बूथच्या मोजणीसाठी तीन लाख रुपये पैसे भरले असल्याचे पांडव यांनी सांगितले. 

प्रक्रियेत प्रशासनीही सहभागी 

लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात वीस ते पंचवीस हजाराची मतदार संख्या वाढली आहे. दरम्यान दक्षिण नागपूर भागातून पाच ते साडेपाच हजार मतदारांची नोंद केली. या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रशासनही सहभागी होतं असा गंभीर आरोप केला. भाजपच्या माध्यमातून नवीन मतदाराची नोंद झाली, पण त्यात काँग्रेसने टाकलेल्या मतदारांची नावे आली नाही. मात्र यात प्रशासनही सहभागी आहे; असा गंभीर आरोप केला.

बोगस मतदान झाल्याचा आरोप 
तर या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला प्रत्येक बूथ निहाय १०० च्यावर मतदान वाढलेले आहे. त्यामुळे हे मत कुठेतरी बोगस असल्याचा आरोप आहे. फिजिकली लोक उभे करून बाहेरून आणलेले बोगस मतदान करण्यात आलं. त्यासाठी व्हीव्हीपॅट मोजणीचा अर्ज केला आहे. मतदानाने मशीनवर पडलेली मत जुडवणी करून द्या. तसेच यापुढेही न्यायालयीन लढा लढण्यासाठी पक्ष श्रेष्ठीने सुद्धा न्यायालयीन लढा देण्याचा सूचना दिल्या आहे. दोन आणि तीन टक्क्यात पूर्ण चित्र बदलत असताना, सात टक्के मतदान वाढलं आहे. यावर शंका उपस्थित केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरकार कर्ज मुक्ती कधी करणार? उद्धव ठाकरेंचा शासनाला रोखठोक सवाल

Kidney Health: किडनी खराब होण्याची ५ महत्त्वाची लक्षणे, दुर्लक्ष केल्यास होतील गंभीर आजार

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, भायखळ्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड; मुंबईकडे येणाऱ्या लोकल खोळंबल्या| VIDEO

Bigg Boss 19: भैया से सैयां...; विकेंड का वारमध्ये सलमान खाननेच केली तान्या मित्तलची पोलखोल

Shocking News : रात्री झोपेतून उठवलं अन् गच्चीवर नेलं, १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; नातेवाईकाचं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT