Nagpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : नागपुरातील घरफोडीतील चोरटे ताब्यात, ३ लाख ७८ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

Nagpur News : शहरातील अनेक भागांमध्ये दिवसभर फिरून बंद घरांवर हे पाळत ठेवत. त्यानंतर रात्रीच्या सुमारास संधी शोधून घरात चोरी करत.

Rajesh Sonwane

पराग ढोबळे

नागपूर : नागपूरच्या पारडी आणि नंदनवन पोलिस ठाणे हद्दीत तीन वेगवेगळ्या घरफोड्या झाल्या होत्या. या घरफोडीतील चोरटे गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या टीमने उघडकीस आणले आहेत. यात आदित्य उर्फ गब्बर व विकास बब्बर आणि अन्य दोन अश्या चौघांना ताब्यात घेतळे. त्यांनी घरफोडीची कबुली दिली असून त्यांच्याकडून ३ लाख ७८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

नागपूर (Nagpur) शहरातील पारडीच्या शिवमन नगरातील निवासी रितिक पटले यांच्याकडे घरफोडी झाली होती. याच तपासा दरम्यान पोलिसांनी मोहम्मद जाकीर मोहम्मद शाहीद आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत चोरीची घटना उघडकीस आणली. तर नंदनवन पोलिस (Police) ठाण्याच्या हद्दीत मिरे ले आऊट मधील ऑटोमोबाईल दुकान फोडून साहित्य लंपास केला होता. या घटनेत शेख सोहेल उर्फ बिदू रोख फारुख आणि सोहेल कसाई ईकबाल कुरेशी याला अटक केलीय.

शहरातील अनेक भागांमध्ये दिवसभर फिरून बंद घरांवर हे पाळत ठेवत. त्यानंतर रात्रीच्या सुमारास संधी शोधून घरात चोरी करत. पोलिसांकडून सातत्याने होत असलेल्या घरफोडीच्या तपासा दरम्यान मुखबिरांच्या माहितीच्या आधारे वेगवेगळ्या घटनेतील चोरट्याना जेरबंद करण्यात यश मिळवले. गुन्हे शाखेच्या युनिट तिनच्या पथकाने (Nagpur Police) कारवाई करत ३ लाख ७८ हजाराच्या मुद्देमाल जप्त केला. यात एकूण चार रेकॉर्डवरील आरोपींना अटक केली. तसेच तीन विधी संघर्ष बालकांना सुधारगृहात पाठवण्यात आले. तर यातील आणखी एका आरोपींचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

WhatsApp Blue Tick : व्हॉट्सॲपवर ब्लू टिक मिळवणं झालं सोपं, जाणून घ्या भन्नाट माहिती

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हा गुडन्यूज देणार? का सुरू आहे अशी चर्चा

Jai Gujarat Row: शिंदेंच्या पक्षाची स्थापना सूरतमध्ये झाली; जय गुजरात’वरून संजय राऊतांचा घणाघात | VIDEO

Maharashtra Live News Update: चामर लेणी येथे झालेल्या ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

SCROLL FOR NEXT