Swine Flu Saam tv
महाराष्ट्र

Swine Flu : नागपुरात कोरोना पाठोपाठ स्वाईन फ्ल्यूने काढले वर तोंड; एका रुग्णाच्या मृत्यूने खळबळ

Nagpur News : देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात महाराष्ट्र कोरोना रुग्णांच्या संख्येत दोन नंबरवर आहे. यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून उपाययोजना म्हणून बेडची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : राज्यात कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यात नागपूरमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेकडून उपाययोजना करण्यात येत असताना आता स्वाईन फ्लू आजाराने डोके वर काढले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेचे टेन्शन वाढले आहे.

देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात महाराष्ट्र कोरोना रुग्णांच्या संख्येत दोन नंबरवर आहे. यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून उपाययोजना म्हणून बेडची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान नागपूरमध्ये देखील मागील काही दिवसात कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून कोरोनाने दोन जणांच्या मृत्यू झाल्यानंतर आता स्वाइन फ्ल्यूने तोंड वर काढायला सुरुवात झाली.

स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू 

सध्या विदर्भात मान्सून लांबला असून नागपुरात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. त्यामुळे हे वातावरण स्वाईन फ्लू आजारासाठी पोषक ठरत आहे. यातच नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या एका रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे ६० वर्षीय व्यक्तीच्या प्रकृती बिघडली. त्यांच्यात स्वाईन फ्ल्यू सदस्य लक्षणे आढळून आल्यावर त्यांच्यावर उपचार करण्यात आला. मात्र मे महिन्याच्या शेवटी त्यांचा मृत्यू झाला.

आरोग्य विभागाच्या नोंदणीनुसार पूर्व विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये १ जानेवारी ते ५ जून दरम्यान २७ स्वयंपलीचे रुग्ण मिळून आले. यापैकी सर्वाधिक १४ रुग्ण हे केवळ नागपूर शहरी भागात मिळून आले आहेत. तेच ग्रामीण भागात ६ रुग्णांची नोंद झाली. तर चंद्रपूर येथे ३ रुग्ण, तर भंडारा गोंदिया गडचिरोली येथील प्रत्येकी एक रुग्ण मिळून आले. यामध्ये बहुतांश रुग्ण हे बरे होऊन घरी सुद्धा गेले आहे. दरम्यान आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Symptoms of Heart Attack: महिनाभर आधीच दिसतात हार्ट अटॅक लक्षणं, या ५ संकेताकडे दुर्लक्ष करू नका

Pandharpur : सोलापूरमध्ये पावसाचा जोर, पंढरपुरातील चंद्रभागा नदीने इशारा पातळी गाठली |VIDEO

Dhangar Agitation : धनगर समाजाचे महाराष्ट्रात चक्काजाम, एकाही गाडी रस्त्यावर फिरू देणार नाही, आरक्षणावरून थेट इशारा

Driverless Auto:भारतात जगातील पहिली ड्रायव्हरलेस इलेक्ट्रिक ऑटो लाँच, कमी किमतीत जबरदस्त फीचर्स

Fire In Nalasopara: नालासोपारा पूर्वेत कपड्यांच्या दुकानाला भीषण आग; दोन दुकानं पूर्णतः खाक|VIDEO

SCROLL FOR NEXT