Taloda News : भावासोबत फिरण्यासाठी गेला असता परतलाच नाही; वाल्हेरी धबधब्यात तरुणाचा बुडून मृत्यू

Nandurbar News : तळोदा तालुक्यातील वाल्हेरी हे स्थळ सतरा किलोमीटर अंतरावर असून या ठिकाणी दोन धबधबे आहेत. या ठिकाणी जिल्ह्यातून व गुजरात राज्यातून अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात
Taloda News
Taloda NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार
: तळोदा तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या वाल्हेरी धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. फिरण्यासाठी गेला असताना पाण्यात उतरल्याने त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण खोल पाण्यात बुडाला. दरम्यान दुसऱ्या दिवशी या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. 

नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील वेलदा येथे राहणारा तरुण दिगंबर प्रदीपभाई मराठे (वय २०, मूळ गाव कुकरमुंडा) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तळोदा तालुक्यातील वाल्हेरी हे स्थळ सतरा किलोमीटर अंतरावर असून या ठिकाणी दोन धबधबे आहेत. या ठिकाणी जिल्ह्यातून व गुजरात राज्यातून अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. तर मे महिन्यात अवकाळी पाऊस झाल्याने धबधबे प्रवाहित झाले असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. 

Taloda News
Nanded : एकाच कुटुंबातील तिघांना विषबाधा; किनवट तालुक्यातील पांगरी गावातील घटना, आरोग्य पथक गावात दाखल

घरी न सांगताच गेला 

दरम्यान दिगंबर मराठे हा ऑनलाइन शैक्षणिक फॉर्म भरण्यासाठी कुकरमुंडा येथे गेला होता. मात्र तांत्रिक अडचणीमुळे काम न झाल्याने त्याने दोन दिवसांनी पुन्हा जाण्याचा विचार केला. त्यानंतर घरी न सांगता तो चुलत भाऊ अभिषेक मराठे व जय अहिर यांच्यासोबत वाल्हेरी धबधब्यावर फिरायला गेला. धबधब्यावर गेल्यानंतर ते पाण्यात उतरले. यावेळी दिगंबर खोल पाण्यात गेला आणि नजरेआड झाला. मित्रांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तो आढळला नाही. 

Taloda News
Soyabean Seeds : शंभर टक्के अनुदानावर मिळणाऱ्या सोयाबीन बियाणे वाटपात घोळ?; शेतकऱ्यांना मिळतेय कमी बियाणे

कुटुंबीयांचा आक्रोश 

संध्याकाळपर्यंत तो न मिळाल्याने घटनेबाबत कुटुंबीयांना कळवण्यात आले. नंतर तळोदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. स्थानिक तरुणांनी धबधब्याच्या खोल पात्रात शोध घेतल्यानंतर दिगंबरचा मृतदेह आढळून आला. त्याच्या कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. इंजिनीयर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या होतकरू तरुणाच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणीदेखील अनेकांचे जीव गेले असल्याचे सांगितले जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com