Tiger  Saam tv
महाराष्ट्र

Tiger Death : विदर्भात १४ दिवसात ६ पट्टेरी वाघांचा मृत्यू; उपासमारीसह मृत्यूची वेगवेगळी कारणे आली समोर

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पालगत प्रादेशिक वन विभागात वाघिणीच्या बछड्यांचा मृतदेह आढळला होता. दहा दिवसांपासून त्याच्या पोटात अन्न नसल्याने उपासमारीने त्याचा मृत्यू झाला.

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : वन्य प्राण्यांचा कमी होत चाललेला अधिवास हा चिंतेची बाब मानली जात आहे. अशातच विदर्भात मागील १४ दिवसात ६ वाघांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत. यात भंडारा जिल्ह्यात २ तर नागपुर, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यात प्रत्येकी १ वाघाचा मृत्यू झाला आहे. या सहा वाघांशिवाय डिसेंबर महिन्यांच्या शेवटी गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रामध्ये तीन वाघांचा बर्ड फ्ल्यूने मृत्यू झाल्याची खळबळ उडाली आहे.   

नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पालगत प्रादेशिक वन विभागात वाघिणीच्या बछड्यांचा मृतदेह आढळला होता. दहा दिवसांपासून त्याच्या पोटात अन्न नसल्याने उपासमारीने त्याचा मृत्यू झाला. तर भंडारा जिल्ह्यात एका वाघाची अत्यंत निर्घृणपणे शिकार करण्यात आली. तर एक वाघ वाहनाच्या धडकेत ठार झाला. दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यात वृद्धापकाळाने एका वाघाचा मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा पट्टेदार मृतदेह आढळला होता. त्यानंतर आता गोंदिया जिल्ह्यात देखील एका पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळला असून वन विभागाकडून या वाघाचा मृत्यू नैसर्गिक झाल्याची माहिती देण्यात आली.

भंडाऱ्यात २ वाघांचा मृत्यु
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असलेल्या लेंडेझरी वनपरिक्षेत्रात २९ डिसेंबरला वाहनाच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला होता. तर ११ केव्ही विद्युत तारांवर आकोडा टाकून वाघिणीची शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार देखील तुमसर वनपरिक्षेत्रातील झंजेरिया जंगलात ६ जानेवारीला उघडकीस आली. यामुळे भंडारा जिल्ह्यात आठ दिवसांच्या अंतरात दोन वाघांचा मृत्यू झाला आहे. 

नागपुरात उपासमारीने मृत्यू 
नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पालगत प्रादेशिक वन विभागात ८ जानेवारी २०२५ ला वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळला. दहा दिवसांपासून त्याच्या पोटात अन्न नसल्याने उपासमारीने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. तर चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावाजवळील जंगलात वृद्धापकाळाने एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना २ जानेवारीला उघडकीस आली. ही घटना सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी शेतशिवारातील नाल्याजवळ घडली.

यवतमाळ, गोंदियातही वाघांचा मृत्यु
यवतमाळच्या वणी परिसरातील उकनी कोळसा खाणीच्या परिसरात तीन ते चार वर्षाचा पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. वाघाचा मृत्यू विजेच्या तारेला झालेल्या स्पर्शाने झाल्याचा अंदाज वन विभागाकडून व्यक्त केला आहे. तसेच गोंदिया जिल्ह्यातील भानपुर गावाजवळ पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळला. या वाघाचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाले असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paracetamol safety: गरोदर महिलांसाठी पॅरासिटोमोल किती सुरक्षित? WHO आणि AIIMS च्या डॉक्टरांनी सांगितलं सत्य

Death : क्रीडा विश्वावर शोककळा; स्टार खेळाडूचे वयाच्या २१ व्या वर्षी निधन, मॅचदरम्यान झाली होती दुखापत

शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार? PM मोदी आणि CM फडणवीसांमध्ये काय चर्चा झाली? VIDEO

Supreme Court : पालकांचा सांभाळ करत नसाल तर संपत्तीतून होणार बेदखल; काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, वाचा सविस्तर

High Cholesterol Symptoms: पायावर ही ५ लक्षणे दिसल्यास व्हा सावध! असू शकतो उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका

SCROLL FOR NEXT