Shiv Bhojan Thali Saam tv
महाराष्ट्र

Shiv Bhojan Thali : शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण

Nagpur News : मजूर, कामगारांना कमी दरात भोजन मिळावं, यासाठी १० रुपयात भोजन देण्याची योजना उद्धव ठाकरे सरकारच्या काळात सुरु करण्यात आली. हि योजना महायुती सरकारच्या काळात देखील सुरु ठेवण्यात आली

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : तत्कालीन मुख्यामंत्री उद्धव ठाकरे यांनी गरिबांसाठी अल्प दरात शिवभोजन थाळी सुरु केली होती. हि योजना आजही सुरु आहे. मात्र राज्यभरातील शिव भोजन थाळी संचालकांना मागील सहा महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही. जवळजवळ शंभर ते सव्वाशे कोटी रुपये थकलेले असल्याचे सांगण्यात येत असून अनुदान न मिळाल्यामुळे शिवभोजन थाळी संचालक अडचणी सापडले आहेत. 

आजच्या महागाईत गरिब मजूर, कामगारांना कमी दरात भोजन मिळावं, यासाठी १० रुपयात भोजन देण्याची योजना उद्धव ठाकरे सरकारच्या काळात सुरु करण्यात आली होती. हि योजना पुढे महायुती सरकारच्या काळात देखील सुरु ठेवण्यात आली आहे. अर्थात यासाठी ठिकठिकाणी सुरु करण्यात आलेला शिवभोजन थाळी केंद्र चालकांना सरकारकडून अनुदान स्वरूपात रक्कम दिली जात होती. मात्र आता हि अनुदानाची रक्कम केंद्र चालकांना मिळत नसल्याची चित्र आहे.

केंद्र चालविण्याचा प्रश्न 
राज्यभरात जवळपास ५ हजार शिवभजन थाळी केंद्र आहेत. कोणीही उपाशी राहू नये यासाठी दहा रुपयात जेवण देण्याची योजना राज्यात राबवली जात आहे. मात्र जानेवारी महिन्यापासून केंद्र चालकांना अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. अर्थात पैसे न मिळाल्यामुळे आता शिवभजन थाळी कशी चालवायची असा प्रश्न संचालकांना पडला आहे. तर शिवभोजन थाळी चालवताना कामगारांचा पगार, लागणाऱ्या अन्नधान्य असो या सगळ्या गोष्टी अडचणीच्या ठरत आहे.

लाडकी बहिणींमुळे अनुदान रखडले?
दरम्यान राज्य सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे शिवभोजन थाळीचे अनुदान रखडले का? असाही प्रश्न आता शिवभोजन चालवणारे संचालक विचारू लागले आहे. तर शहरातील काही रुग्णालयासमोर शिवभोजन थाळी ही बाहेर जाऊन येणाऱ्या रुग्णांनी रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भार न पडता उपयोगी ठरते. मात्र पुढच्या काळात हे चालवणे कठीण होणार असल्याचे शिवभोजन थाळीचे संचालकाने सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात मान्सूनला निरोपाला कधी? परतीच्या पावसाची तारीख आली समोर

Maharashtra Dasara Melava Live Update : संघाला १०० वर्षे, सरसंघचालक मोहन भागवत काय बोलणार?

Mhada Homes: मुंबईत म्हाडाची घरे महागली! ठाणे, पनवेल, पालघर परिसरात ३५० हेक्टर जमीन उपलब्ध करण्याची मागणी

New Expressway : नागपूरमधून आणखी एक एक्सप्रेस वे जाणार, फडणवीस सरकारने दिली मान्यता

Arvind Srinivas: फक्त ३१व्या वर्षी तब्बल २१,१९० कोटींचा मालक, कोण आहेत अरविंद श्रिनिवास?

SCROLL FOR NEXT