Breaking News

Sambhajinagar : संभाजीनगरात पोलिसांची मोठी कारवाई; कंपनीत छापा टाकत सव्वा कोटींचे एमडी ड्रग्स जप्त

Sambhajinagar News : संभाजीनगर शहरासह परिसरातील अवैध गांजा, एमडीसह कोट्यवधींच्या नशेच्या पदार्थांची सर्रास विक्री सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एनडीपीएस पथक आणि वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई
Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv
Published On: 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल सव्वा कोटींचे एमडी ड्रग सापडले आहे. एका कंपनीत पोलिसांनी छापा टाकला. त्यात तीन वेगवेगळ्या पॉकेटमध्ये जवळपास १५०० ग्रॅम एमडी ड्रग सापडल्यानं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तीन जणांवर रात्री उशिरा वाळूज एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संभाजीनगर शहरासह परिसरातील अवैध गांजा, एमडीसह कोट्यवधींच्या नशेच्या पदार्थांची सर्रास विक्री सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एनडीपीएस पथक आणि वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. एमडी ड्रग सदरच्या कंपनीतून अत्यंत व्यवस्थितपणे ग्राहकापर्यंत पोहोचवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान कंपनीत निघणाऱ्या स्क्रॅप मधून स्मग्लींग करण्यात येत होते. दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरामध्ये अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने भंगार व्यावसायिकांच्या गोडाऊनवर छापे टाकले.

Sambhajinagar News
Chandrabhaga River Flood : चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी वाढ; वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली, आषाढीवर पुराचे सावट

दीड किलो पावडरचा साठा जप्त 

पोलिसांनी छापा टाकत केलेल्या कारवाईत गोळ्या आणि कॅप्सूलमध्ये वापरण्यात येत असलेले केमिकल पावडर आढळून आले. कंपनीतील बंद ड्रममध्ये गोळ्यांच्या पावडरची विक्री केली जात होती. तसेच येथे असलेल्या दोन टेंपोमध्ये असलेले रिकामे ड्रम व प्लॅस्टिक बॅगमधून १ किलो ४०० ग्रॅम केमिकलयुक्त संशयास्पद पावडर जप्त केली होती. याठिकाणाहून पथकाने तब्बल दीड किलो पावडर जप्त केली होती. या पावडरचा वापर नशेच्या गोळ्यांसाठी केला जात असल्याचा संशय होता. 

Sambhajinagar News
Beed : महावितरणच्या कर्मचाऱ्यास कंत्राटदाराकडून मारहाण; बीडच्या पाटोदा येथील प्रकार, कार्यालयात केली तोडफोड

गोडाऊन सील करत गुन्हा दाखल 

जप्त केलेल्या पावडरची तपासणी केल्यानंतर ते एमडी ड्रग असल्याची माहिती समोर आली. त्यावरून आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच दोन्ही गोडाऊनला सील करण्यात आले आहेत. तर यात अनेक बडे लोक सहभागी असण्याची शक्यता आहे. त्यावरून तपास सुरू आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com