Nagpur Tehsil Police Station Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur News: नव्या कायद्यानुसार राज्यात दुसरा गुन्हा दाखल, नागपूरात पान टपरी चालकाविरोधात कारवाई

2nd Case Filed In State Under New Law: नागपुरात भारतीय न्याय संहिते अंतर्गत पहिला गुन्हा तहसील पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. एका पान टपरी चालकाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

पराग ढोबळे, नागपूर

देशामध्ये सोमवारपासून तीन नवीन फौजदारी कायदे (New Law) लागू करण्यात आले. या नव्या कायद्यानुसार राज्यात पहिला गुन्हा अकोल्यामध्ये दाखल करण्यात आला होता. तर मिळालेल्या माहितीनुसार दुसरा गुन्हा नागपूरमध्ये दाखल करण्यात आला आहे. नागपूरच्या तहसील पोलिस ठाण्यामध्ये (Tehsil Police Station) एका पान टपरी चालकाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा नागपूरमधील (Nagpur) पहिला गुन्हा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात भारतीय न्याय संहिते अंतर्गत पहिला गुन्हा तहसील पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३५२ आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम ३५१ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत जागनाथ बुधवारी परिसरात या प्रकरणातील तक्रारकर्ते यांचे हॉटेल आहे. हॉटेलच्या समोर असलेल्या पान टपरी चालकाने त्यांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर हॉटेल मालकाचे पान टपरी चालकाविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी पान टपरी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अकोल्यामध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. बोरगाव मंजू गावातील रामजीनगर भागातल्या नितीन जानकीराम गवई या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन गवईवर अनेक गुन्हे दाखल आहे. तो न्यायालयात सतत गैरहजर राहत असून फरार झाला होता. पोलिस काँस्टेबल आनंद चव्हाण यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर नितीन गवईला नव्या कलमानुसार फरार असल्याच्या कलमाखाली अटक करण्यात आली. बोरगाव मंजू पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोज केदार यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, देशात सोमवारपासून ३ नवीन फौजदारी कायदे लागू झाले. संसदेत नव्याने मंजूर करण्यात आलेल्या कायद्यामध्ये अनेक बदल करण्यात आले. जुन्या भारतीय दंड संहितामध्ये ५११ कलम होते. मात्र नव्याने तयार करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहितेत ३५८ कलम आहे. आता फसवणुकीसाठी कलम ४२० ऐवजी ३१६ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जाणार आहे. तर हत्येसाठी कलम ३०२ ऐवजी १०१ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्तांनी उचललं टोकाचं पाऊल; घरातच गळफास घेत आयुष्य संपवलं

Rave Party : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, खडसेंच्या जावायाचा अल्कहोल रिपोर्ट समोर

Maharashtra Live News Update: उद्या दुपारी होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Crime: तिला मारून टाक, तुझं दुसरं लग्न करू; सोशल मीडियावर VIDEO पोस्ट करत पोलिसाच्या बायकोची आत्महत्या

Farmer Success Story : लातूरच्या मातीत विदेशी फळ; शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी, वर्षाकाठी घेताय एकरी १२ लाखाचे उत्पादन

SCROLL FOR NEXT