Sana Khan Case Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Sana Khan Case: सना खान हत्या प्रकरण, माहिती देणाऱ्याला पोलीस देणार लाखोंचे बक्षीस

Nagpur Police: या हत्याकांड प्रकरणाची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी लाखोंचे बक्षीस जाहीर केले आहे.

Priya More

संजय डाफ, नागपूर

Sana Khan Murder Case Update: नागपूर (Nagpur) येथील भाजपच्या महिला पदाधिकारी सना खान हत्या प्रकरणात (Sana Khan Case) महत्वाची माहिती समोर आली आहे. या हत्याकांड प्रकरणाचा नागपूर पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. सना खान यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे पण त्यांचा मृतदेह अद्याप सापडला नाही. त्यामुळे आता नागपूर पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. या हत्याकांड प्रकरणाची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी लाखोंचे बक्षीस जाहीर केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील भाजप पदाधिकारी सना खान हत्या प्रकरणात माहिती देणाऱ्यास नागपूर पोलीस बक्षीस देणार आहे. सना खान यांचा मृतदेह अद्याप साडला नसल्यामुळे यासंदर्भात कोणी माहिती दिल्यास नागूपर पोलीस बक्षीस देणार आहेत. माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे नागपूर पोलिसांनी जाहीर केले आहे. नागपूर पोलिसांची टीम सध्या या हत्याकांड प्रकरणाचा तपास जबलपूरमध्ये करत आहे.

सना खान हत्याकांड प्रकरणात नागपूर पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सना खानचा बिझनेस पार्टनर अमित उर्फ पप्पू साहू याला अटक केली असून त्याने सना खानची हत्या केल्याची कबुली दिली आहे. सना खानची हत्या केल्यावर तिचा मृतदेह हिरन नदीत फेकल्याचं आरोपीने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले होते.

सना खानचा मृतदेह नदीत फेकला तिथे पोलीस अमित साहूला घेऊन गेले होते. पोलिसांनी या नदीत मृतदेहाचा शोध घेतला पण त्यांना मृतदेह सापडला नाही. सना खानची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पण त्यांचा मृतदेह सापडत नसल्यामुळे नागपूर पोलिसांनी आता सना खान यांच्या मृतदेहाची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर केले आहे. आता तरी सना खान यांचा मृतदेह सापडेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Vaccine: जग कॅन्सरमुक्त होणार? कॅन्सर रुग्णांसाठी मोठी खूशखबर

Ayush Komkar Funeral : माझी चूक नसतानाही मुलाची हत्या; मुलाला अग्नी देताना गणेश कोमकर ढसाढसा रडला

Dark Circles Symptoms: डोळ्यांखाली डार्क सर्कल कोणत्या कमतरतेमुळे येतात? ही आहेत लक्षणे आणि उपाय

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील त्यांच्या राहत्या घरी पोहोचले

Bengali white saree: दुर्गापूजेला बंगाली महिला लाल बॉर्डर असलेली पांढरी साडी का नेसतात? जाणून घ्या खरं कारणं

SCROLL FOR NEXT