Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur: दारूबंदी असतानाही विक्री; एकाला अवैध दारूसाठ्यासह अटक

Nagpur News : पोलीस पेट्रोलिंगवर असतांना छापा टाकण्यात आला. यावेळी रुपसिंग यांच्याकडे देशी, इंग्रजी तसेच मोहफुलीची दारू असा एक लाख तीस हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : सण उत्सवाचे दिवस सुरु आहेत. यातच गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद असल्याने पोलीस प्रशासनाकडून या काळात दारूबंदीचे आदेश काढले होते. असे असताना देखील एकाने दारू विक्रीच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात साठा आणला होता. पोलिसांना सदरचा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधिताला अटक करत अवैध दारूसाठा जप्त करण्याची कारवाई केली आहे. 

नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी सदरची कारवाई केली आहे. यात रूपसिंग जितसिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान ईद ए मिलाद उन्नबी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दारूबंदी अर्थात या काळात दारू विक्रीस मनाई करण्यात आली होती. असे असतानाही आरोपीने विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात साठा आणला होता. याच पार्श्वभूमीवर रूपसिंगवर पाचपावली पोलिसांनी कारवाई केली.

पेट्रोलिंग करताना टाकला छापा 
पाचपावली पोलीसांना या प्रकरणी माहिती मिळाली होती. यानंतर स्टेशनचे पोलीस पेट्रोलिंगवर असतांना छापा टाकण्यात आला. यावेळी रुपसिंग यांच्याकडे देशी, इंग्रजी तसेच मोहफुलीची दारू असा एक लाख तीस हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे या आरोपीने आपल्या घरातील बेड, कुलर आणि विविध ठिकाणी लपवून ठेवलेला माल पोलिसांनी शोधून जप्त केला आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात पाच सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए
यवतमाळ : आगामी सण उत्सव आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये, शांतता व सुवस्था कायम राहावी म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील पाच सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच आरोपींना अटक करून त्यांची नागपूर, अकोला व वाशिम येथील कारागृहात रवानगी करण्यात आली. या कारवाईमुळे जिल्हा पोलिस दल अ‍ॅक्शन मोडवर आल्याची चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला २४ तास उशीर, जबाबदार कोण? अध्यक्षांकडून दिलगिरी

Lalbaugcha Raja Visarjan : ‘पुढच्या वर्षी लवकर या’ लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले

Lalbaghcha Raja : फटाक्यांच्या आतिषबाजीत लालबागच्या राजाला दिला निरोप, VIDEO

lalbaugcha raja : ...अन् अंबानींचे सुरक्षा रक्षक आणि कोळी बांधवांनी तराफा पाण्यात ढकलला; लालबागचा राजा विसर्जनासाठी सज्ज, VIDEO

Daily Horoscope: इच्छापूर्ती, मेहनतीला यश ते व्यापारात फायदा; वाचा तुमचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT