धुळे : धुळे तालुक्यातील वरखेडी फाटा परिसरात ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. यात ट्रॅक्टरने हुलकावणी दिल्याने लोखंडी आसऱ्यानी भरलेला ट्रक अनियंत्रित होऊन पुलाला जाऊन धडकला. या भीषण अपघात ट्रकचा कॅबिन पूर्णपणे दाबली गेली असून यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
धुळे तालुक्यातील वरखेडी फाटा सकाळच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. महामार्गावरून जात असलेल्या आसऱ्यानी भरलेला मोठा ट्रक जात होता. याचवेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टरने ट्रकला हुलकावणी दिली. यामुळे ट्रॅक्टरला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. यामुळे अवजड ट्रक समोर असलेल्या पुलाच्या भिंतीवर जाऊन धडकला.
दोघांचा जागीच मृत्यू
या अपघातात कंटेनर मधील दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाला आहे. जखमीस तात्काळ परिसरातील नागरिकांतर्फे बचाव कार्य करीत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघात इतका भयंकर होता कि, ट्रकचा कॅबिनचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. दरम्यान अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक देखील खोळंबली होती.
मजुरांना घेऊन जाणारा पिकअप पलटी, १२ जण जखमी
नाशिक : नाशिकच्या बागलाण येथून नांदगाव येथे मजुरांना शेती कामासाठी घेऊन जात असलेलय पिकअप गाडीचा आंबसन फाट्याजवळ अपघात झाला. यात १२ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. या रस्त्यावरील काम गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण असल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असल्याने वेगाने जात असलेला पिकअप पलटी होऊन हा अपघात झाला. या सर्व गंभीर जखमींना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.