nagpur, bhivapur, dilip sontakke case
nagpur, bhivapur, dilip sontakke case Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur News : 5 लाखांची सुपारी देत मुलीने वडिलांचा विषयच संपवला; पाेलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

संजय डाफ

Nagpur Crime News : नागपूर (nagpur) जिल्ह्यातील भिवापूर (bhivapur) तालुक्यात धारदार शस्त्रांनी पेट्रोल पंप मालकाचा आठवड्यापुर्वी खून करण्यात आला हाेता. दिलीप सोनटक्के (dilip sontakke) असे खून झालेल्या पेट्राेल पंप मालकाचे नाव असून त्याच्या मुलीनेच खूनाची सुपारी दिल्याचे पाेलीस तपासात उघड (daughter gave rs 5 lakh supari says police) झाले आहे. याबाबतची माहिती पाेलीसांनी साम टीव्हीला दिला. (Maharashtra News)

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर (bhivapur) तालुक्यात गेल्या आठवड्यात दुपारच्या सुमारास तिघांनी धारदार शस्त्रांनी पेट्रोल पंप मालक दिलीप सोनटक्के (dilip sontakke) यांचा खून केला. त्यानंतर घटनास्थळावरुन पेट्रोल पंपावरील दोन लाख रुपयांची लूट करुन तिघांनी पळ काढला हाेता.

या घटनेनंतर पेट्राेल पंपावर एकच गाेंधळ उडाला हाेता. नागरिकांची घटनास्थळी माेठी गर्दी जमली हाेती. ही हत्या अनैतिक संबंध, प्रॉपर्टी आणि लुटपाटच्या उद्देशाने झाल्याची प्राथमिक माहिती त्यावेळी पाेलीसांकडून उपलब्ध झाली हाेती.

दरम्यान दिलीप सोनटक्के यांच्या खूनाच्या प्रकरणाचा उलगडा पाेलीसांनी केला. पोटच्या विवाहित अपंग मुलीनेच साेनटक्के यांच्या खूनाची सुपारी दिल्याचे उघड झाले आहे. वडिलांचे विवाहबाह्य संबंध आणि यातून होणारा प्रॉपर्टी वाद यामुळे साेनटक्के यांची मुलीने पाच लाख रुपये देत सुपारी दिल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे.

पोलिसांनी या प्रकरणी प्रिया किशोर माहुरतळे या साेनटक्के यांच्या मुलीस संशयित म्हणून अटक केली आहे. प्रिया ही दिलीप सोनटक्के यांची मोठी मुलगी आहे. ती डाव्या हाताने अपंग आहे. वडील एका महिलेसोबत राहत असल्याने सोनटक्के कुटुंबात वाद सुरु होता. भविष्यात प्रॉपर्टीसुद्धा हातातून जाईल म्हणून मुलीने खूनाचा कट रचल्याची माहिती पाेलीसांना तपासात आढळली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Loksabha News: वंचितचा पक्ष वंचितांसाठी आहे की धनदांडग्यांसाठी? प्रकाश शेंडगेंचा सवाल; विशाल पाटलांच्या पाठिंब्यावरुन टीकास्त्र

Neck Pain: मान अवघडू नये त्यासाठी 'हे' उपाय ठरतील रामबाण

Hair Care Tips: 'या' टीप्स फॉलो केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Today's Marathi News Live : मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 'वोट फॉर स्ट्रॉंग गव्हर्नमेंट' अभियान

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाची कारला धडक, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, दोघे जखमी

SCROLL FOR NEXT