Nagpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : चक्क केसाच्या ट्रीटमेंट खर्चासाठी करायचा दुचाकी चोरी; नागपूर पोलिसांनी घेतले ताब्यात

Nagpur News : काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याबाबत पोलिसात तक्रार देखील दाखल होत्या. त्यानुसार पोलिसांकडून तपास सुरु असताना दुचाकी चोरटे पोलिसांच्या हाती लागले आहेत

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 
नागपूर
: नागपूर शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याचा तपास करताना पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. यात चोरट्याने कबुली दिली असून दुचाकी चोरी करण्यामागचे कारण सांगताच पोलीस देखील चक्रावले होते. त्याच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनला यश आले. यासोबत त्याचा साथीदारला अटक करण्यात आली.

नागपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने सदर कारवाई केली असून सर्फराज सलीम शेख आणि अरबाज अहमद रईस अहमद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याबाबत पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार पोलिसांकडून तपास सुरु असताना दुचाकी चोरटे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

पेट्रोलिंग करताना चोरटा ताब्यात 

लकडगंज परिसरात पोलीस पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना माहिती मिळाली की अरबाज अहमद हा चोरी केलेली एक दुचाकी वाहन विकण्याच्या तयारीत आहे. यावरून पोलिसांनी ट्रॅप लावत आरोपीला ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर त्याचाकडून गुन्ह्याची चौकशी केली असताना वाहन चोरीची कबुली दिली. 

सहा दुचाकी जप्त 
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता विविध पोलीस स्टेशन हद्दीतून सहा दुचाकी वाहन चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्याने ही चोरी केसाच्या ट्रीटमेंटसाठी लागणाऱ्या खर्चासाठी केल्याची माहिती दिली. क्राईम ब्रँचच्या युनिट तीनने त्याच्याकडून सहा दुचाकी वाहन जप्त करत दोघाना अटक करत पुढील तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांकडून आणखी तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT