Nagpur Crime  Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Crime: नागपूरमध्ये चाललंय काय? आधी चाकूनं भोसकलं, नंतर दगडाने मारहाण; तरुणाचा तडफडून मृत्यू

Nagpur Police: नागपूरमध्ये तरुणाची चाकूने भोसकून आणि दगड- विटाने मारहाण करत निर्घृण हत्या करणण्यात आली. या घटनेत तरुणाचा जागीच तडफडून मृत्यू झाला. नागपूरच्या धंतोली पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली.

Priya More

पराग ढोबळे, नागपूर

नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. नागपूरमध्ये क्षुल्लक कारणावरून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. नागपूरच्या धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अवघ्या काही तासांमध्ये अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या धंतोली पोलिस स्टेशन हद्दीत क्षुल्लक कारणावरून एकाची चाकू आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. करण नैनिकर असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर यातील मुख्य आरोपी कुणाल राऊत आहे.

हत्या करण्यात आलेला करण आणि आरोपी कुणाल हे एकाच ठिकाणी राहतात. दोघांमध्ये काहीना काही कारणांवरून नेहमी वाद होतात. मंगळवारी रात्री दोघांमध्ये काही कारणांवरून वाद झाला. हा वाद ऐवढा विकोपाला गेला की या वादामध्ये कुणाल राऊतचे मित्र आणि त्याची पत्नी सुद्धा पडली. या चौघांनी आधी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केला. नंतर दगड आणि विटांनी त्याला मारहाण केली.

या मारहाणीमध्ये आणि हल्ल्यामध्ये करण गंभीर जखमी झाला. अति रक्तस्राव झाल्यामुळे यामध्ये करणचा जीव गेला. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून तपास सुरू आहे. धंतोली पोलिस आरोपींची कसून चौकशी करत आहेत. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या आरोपी पोलिस कोठडीमध्ये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: उद्यानातील झाडांवर फिरवली कुऱ्हाड, पालिकेचा कर्मचारीच निघाला 'पुष्पा'; लाकडं घेऊन जातानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: मेळघाटात धक्कादायक प्रकार; दफन केल्यानंतर 23 दिवसांनी मृतदेह काढला बाहेर

Abhijeet Dipke : सीजेपी पुन्हा सरकारविरोधात मोठं आंदोलन करणार; अभिजित दीपिकेंचा इशारा

मेथीच्या भाजीपासून बनवा कुरकुरीत भजी, चविष्ट आहे रेसिपी

Mukkam Post Pandharpur: श्रद्धा आणि आत्मशोधाचा भावस्पर्शी प्रवास उलगडणार; 'मुक्काम पोस्ट पंढरपूर' लवकरच रंगभूमीवर

SCROLL FOR NEXT