
Nagpur Crime: नागपूरमध्ये वहिनीशी अनैतिक प्रेमसंबंधाच्या संशयातून हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना कळमना पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांच्या तपासामध्ये मृत व्यक्ती राहुल गुप्ता हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे म्हटले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु करुन आरोपीला अटक केली आहे.
वहिनीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन राहुल गुप्ताचा मृत्यू झाला. या गुन्ह्यात आरोपी राजन खानला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी राजन आणि राहुल यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली होती. संशयावरुन त्यांच्यात भांडणदेखील झाले होते. दोघांनीही एकमेकांना जीवे मारणार असल्याची धमकी दिली होती.
संध्याकाळी सातच्या सुमारास राजा खान आदिवासी प्रकाशनगरमध्ये एका दुकानाजवळ उभा होता. थोड्या वेळात त्या ठिकाणी राहुलदेखील पोहोचला. त्यांच्यामध्ये वाद सुरु झाला. त्या दोघांनीही एकमेकांना शिवीगाळ करायला सुरुवात झाली. वाद वाढत गेला आणि ते हाणामारी करु लागले. हाणामारीत राजाने रस्त्याच्या बाजूला पडलेला लाकडी दांडा उचलला आणि जोरात राहुलच्या डोक्यात मारला. वेदनेत कळवळत असलेल्या राहुलला सोडून राजा पळून गेला.
पुढे राहुलने झालेला प्रकार मित्राला सांगितला. मित्राने राहुलच्या कुटुंबियांना हाणामारीची माहिती दिली. डोक्याला मार लागल्याचेही सांगितले. तेव्हा कुटुंबियांनी राहुलला रुग्णालयात दाखल करायचे ठरवले. पण रुग्णालयात जाण्यास राहुल गुप्ताने नकार दिला. ते सर्वजण घरी परतले. घरी गेल्यावर राहुल झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी कुटुंबियांनी त्याला जागं करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा रात्रीच मृत्यू झाला होता. त्यानंतर डॉक्टरांनीही तो मृत असल्याचे घोषित केले. राहुल गुप्ताच्या मृत्यूनंतर कळमना पोलिसांनी राजा खानला अटक केली.
राहुल गुप्ता आदिवासी प्रकाशनगरमध्ये वास्तव्याला होता. तो गुन्हेगारी क्षेत्रामध्ये होता. त्याच्या विरोधात मारहाण करणे, चोरी घरफोडीसह असे अनेक गुन्हे होते. शस्त्र प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्ह्यातही त्याचे नाव होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.