Nagpur Fire News: Saamtv
महाराष्ट्र

Nagpur Fire News: कचऱ्याची विल्हेवाट लावताना मोठी दुर्घटना! नागपुरातील कंपनीत भीषण आग; एका कर्मचाऱ्याचा होरपळून मृत्यू

Nagpur News: कंपनीने उत्पादित केलेल्या टाकाऊ साहित्याची विल्हेवाट लावत ते नष्ट करत असताना ही आग लागली. यामध्ये एकाचा मृत्यू तर एक कामगार गंभीर जखमी झाला.

संजय डाफ

Nagpur News: नागपूरमधून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. नागपूर जवळील बाजारगाव येथील इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह कंपनीत आज (१३, ऑगस्ट) भीषण आग लागली. या आगीमध्ये एका कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला तर आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. (Nagpur News)

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूर (Nagpur News) जवळील बाजारगाव येथील इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह कंपनीत भीषण आगीची घटना समोर आली आहे. इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह कंपनीने उत्पादित केलेल्या टाकाऊ साहित्याची विल्हेवाट लावत ते नष्ट करत असताना आग लागली.

सकाळी पावणेसातच्या सुमारास अचानक या साहित्यातून जोरदार ज्वाला निघाली. त्यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट लावणारे दोन कामगार गंभीर जखमी झाले. जखमी कामगारांना तात्काळ नागपुरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते.

यावेळी उपचारादरम्यान एका कामगाराचा मृत्यू झाला. प्रतिक कळसकर असे मृत कामगाराचे नाव आहे. सुनील शेंद्रे या जखमी कामगारावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगाराला कंपनीकडून २२ लाखांची मदत करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पार्टनरसाठी पैसा खर्च करावा लागणार; प्रेमात वाद होणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Saturn Jupiter yog: 48 तासांनंतर पलटणार 'या' राशींचं नशीब; शनी-गुरु तयार करणार शतांक योग, मिळणार फक्त पैसा

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

SCROLL FOR NEXT