Nagpur news  Saam tv
महाराष्ट्र

Scam : बोगस शालार्थ आयडी प्रकरण; नागपुरातील आणखी एक संस्थाचालक ताब्यात

Nagpur news : नागपुरातील या शालार्थ आयडी घोटाळा गाजत असून याप्रकरणी आतापर्यंत काही संस्थाचालक व बोगस शिक्षकांना ताब्यात घेत कारवाई झाली आहे. या नंतर आणखी एका शिक्षण संस्थाचालकास पोलिसांनी अटक केली

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : नागपुरात समोर असलेल्या शिक्षक भरती घोटाळा राज्यभरात गाजत आहे. या प्रकरणात चौकशी सुरु असून अनेकांचा यात सहभाग असल्याचे समोर येत आहे. दरम्यान या प्रकरणात नागपुरातील आणखी एका संस्थाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  अटकेनंतर या संस्थाचालकास पीसीआर मिळवला आहे. तर २७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत तपास केला जाणार आहे.

नागपुरात समोर आलेल्या शालार्थ घोटाळ्यात शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. नागपुरातील या शालार्थ आयडी घोटाळा गाजत असून याप्रकरणी आतापर्यंत काही संस्थाचालक व बोगस शिक्षकांना ताब्यात घेत कारवाई झाली आहे. या नंतर आणखी एका शिक्षण संस्थाचालकास पोलिसांनी अटक केली आहे. बोगस शालार्थ आयडी बनवलेल्या ३६ शैक्षणिक संस्थेत ६०० च्यावर शिक्षकांची संख्या आहे. त्यामुळे पुढच्या काळात आरोपींची संख्या संख्या टप्प्याटप्प्याने वाढणार आहे.

३० शिक्षकांचा बोगस शालार्थ आयडी 

ओंकार भाऊराव अंजीकर असं अटक करण्यात आलेल्या शिक्षण संस्थाचालकाचं नाव आहे. नागपुरात एस. के. बी. प्राथमिक आणि माध्यमिक विद्यामंदिर नागपूर ह्यांचा नामक तीन संस्था आहे. यामध्ये ३० शिक्षकांचा बोगस शालार्थ आयडी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान ओमकार अंजीकर याचा अटकेनंतर पीसीआर मिळवला आहे. तर २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत तपास केला जाणार आहे.

आरोपींची संख्या वाढणार 
दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अंजीकर याचा तपास सुरू आहे. तर त्यावेळी शिक्षणाधिकारी कोण होते? शिक्षण उपसंचालक आणि वेतन पथक अधीक्षक होते. या सगळ्याची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये आरोपीची संख्या निश्चितच वाढणार आहे. दरम्यान निलेश वाघमारे हा फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: CA झाला, अमेरिकेतील लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी धुडकावली, पहिल्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS केशव गोयल यांचा प्रवास

Pune : जिवाभावाचा मित्र वाढदिवसाला आलाच नाही, संतापलेल्या दोस्तांनी २५ वाहनांची केली तोडफोड

Friday Horoscope : जवळच्या लोकांकडून वाहवाह होईल, प्रगती घडेल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Red Alert in Maharashtra : पाऊस आज कहर करणार, ७ जिल्ह्यांना रेड अलर्ट, IMD च्या इशाऱ्यानंतर २ जिल्ह्यातील शाळा-कॉलेज बंद

Shukrwar che Upay: शुक्रवारच्या 'या' उपायांनी भाग्याचे दरवाजे उघडतील; घरात सुख-समृद्धी सोबत पैसाही येईल

SCROLL FOR NEXT