Accident News
Accident NewsSaam tv

Accident News : शेताच्या बांधावरून जाताना ट्रॅक्टर उलटला; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Pune News : दीपक सैद यांच्या शेताच्या बांधावरुन ट्रॅक्टर उलटला. त्याखाली दीपक सैद दबले गेले. घटना पाहून नागरिकांनी धाव घेतली. नागरिकांनी जेसीबी मशिनच्या सहाय्याने ट्रॅक्टर उचलून त्यांना बाहेर काढले
Published on

मंचर (पुणे) : शेतामध्ये ट्रॅक्टरचे नुसते धूड घेऊन शेताच्या बांधावरून जात असताना ट्रॅक्टर पलटी झाले. या अपघातात ट्रॅक्टरच्या खाली दबले गेल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथे घडली आहे. घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी धाव घेत जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टर बाजूला करत शेतकऱ्याला बाहेर काढण्यात आले होते. 

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ शिवारात हि घटना घडली आहे. या अपघातात दीपक रघुनाथ सैद (वय ४१) या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दीपक सैद यांच्या शेताच्या बांधावरुन ट्रॅक्टर खाली पलटी झाला. त्याखाली दीपक सैद दबले गेले होते. घटना पाहून नागरिकांनी धाव घेतली. नागरिकांनी जेसीबी मशिनच्या सहाय्याने ट्रॅक्टर उचलून त्यांना बाहेर काढत उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. 

Accident News
Nandurbar Heavy Rain : मुसळधार पावसात घराची भिंत कोसळली; दबले गेल्याने पती- पत्नी गंभीर जखमी, वाण्याविहीर गाव पाण्यात

हिंगोली शहरात दुचाकी पिकअपचा भीषण अपघात
हिंगोली
: हिंगोली शहरातील एनटीसी परिसरात पिकअप वाहन व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांनी पाय गमावल्याची घटना घडली आहे, जिल्हा सरकारी कामगार कार्यालयाच्या परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना पिकअप वाहनाने कट मारल्याने हा अपघात घडला आहे.  

Accident News
Hingoli Crime : हॉटेलात जेवणासाठी गेलेल्या मित्रांवर जीवघेणा हल्ला; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

पिकअप वाहनाने कट मारल्याने दुचाकी सिमेंट रस्त्याच्या बाजूला असलेल्या नालीमध्ये कोसळली. यात दुचाकी वरील दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर हिंगोली शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत दोन्ही वाहने ताब्यात घेत जखमींना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती केले होते. मात्र दुचाकीवरील दोघांचे पाय निकामी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com