Nagpur Dengue: पावसाळा आला की विविध साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. राज्यात सध्या डोळे येण्याची आणि डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणावर आहे. नागपुरमध्ये यंदा डेंग्यूने कहर केला असून गेल्या १५ दिवसांत ५९ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १५ दिवसांतील संशयित रुग्णांची संख्या १२४५ इतकी आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपुरमध्ये डेंग्यूच्या साथीने नागरिकांची चिंता वाढली आहे. नागपुरमध्ये डेंग्यूची साथ दिवसेंदिवस वाढताना दिसत असून रोज सरासरी डेंग्यूचे चार रुग्ण सापडत आहेत. त्यामुळेच नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांची संख्या चिंतेंचा विषय ठरत आहे.
गेल्या १५ दिवसांत ५९ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली असून १२४५ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
नागपुरप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्येही डेंग्यूच्या साथीने डोके वर काढले आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात दोन आठवड्यात डेंग्यूचे तब्बल ५९ संशयित तर १२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण उपचार घेत आहेत.
पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात एकदाही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे डासांचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहेत १ ऑगस्टपासून १८ ऑगस्टपर्यंत ५९ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले. तर १२ रुग्ण बाधित निघाले आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.