viral fever news  saam tv
महाराष्ट्र

नागपूरकरांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; जिल्ह्यात डायरिया, कॉलरा आणि गॅस्ट्रोच्या साथीने नागरिक त्रस्त

नागपूर जिल्ह्यात 'व्हायरल फिवर'च्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं दुषित पाण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळं कॉलरा, डायरिया आणि गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले आहेत.

संजय डाफ

नागपूर : नागपूर (Nagpur) जिल्ह्यात 'व्हायरल फिवर'च्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं दुषित पाण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळं कॉलरा, डायरिया आणि गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले आहेत. नागपूर जिल्ह्यात कॉलराचे आतापर्यंत ३, डायरियाचे आठ तर, गॅस्ट्रोचे ५५ रुग्ण आढळून आले. या रुग्णांच्या संख्येमुळे घाबरण्याचं कारण नसलं तरी आरोग्य विभागानं खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. (Nagpur News In Marathi )

सध्या सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरी व ग्रामीण गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीपुरवठा योजना, धरणे, विहिरी पाण्याने भरून गेल्या आहेत. यातूनच जलजन्य आजार वाढून आरोग्य (Health) बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. कॉलरा, डायरिया आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. सध्या जिल्ह्यात कॉलराचे आतापर्यंत ३, डायरियाचे आठ तर, गॅस्ट्रोचे ५५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळं जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून, गाळून व थंड करून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, पाण्याच्या दूषितपणात प्रचंड वाढ झाली आहे. त्याचा जलाशयातील जीवजंतूंवरही विपरित परिणाम होऊ लागला आहे. जवळपास ८० टक्के आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. लहान मुलांना जलजन्य आजार लवकर होतात. त्यामुळं मुलांची काळजी घेण्याची गरज आहे. तसंच पाण्याच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. पावसाळा सुरू झाला की व्हायरल आजार वाढतात. त्यामुळं नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tushar Apte : बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजपचा स्वीकृत नगरसेवक

Shocking : "तुला पाळी आली असेल तर पुरावा दाखव", शिक्षिकेची अपमानास्पद वागणूक, विद्यार्थिनीचा मृत्यू; सरकारी कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

Pooja Sawant Mangalsutra: मराठमोळा साज! हे आहेत लेटेस्ट ट्रेडिंग लांब मंगळसूत्राचे पॅटर्न

Yuzvendra And Dhanashree: डिव्होर्सनंतर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा येणार एकत्र; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव, बहीण-भाऊ अन् बापाचा होरपळून मृत्यू, गाढ झोपेत असतानाच....

SCROLL FOR NEXT