Nagpur Airport Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Airport : नागपूर विमानतळावर खळबळ; प्रवाशाच्या बॅगेत सापडले काडतूस

Nagpur News : नागपूरच्या विमानतळावर जिवंत काडतूस आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईसाठी जात असलेल्या प्रवाश्याच्या बॅगेतून हे काडतुस मिळून आले आहेत. इरफान खान हा मुंबईला जात असलेल्या प्रवाश्याचे नाव

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 
नागपूर
: मागील आठवड्यात नागपूरच्या विमानतळावर कार्गो पार्सल सेवेतून गांजाची तस्करी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. यानंतर पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर विमानतळावर मुंबईला जाणाऱ्या एका प्रवाशाच्या बॅगेतून दोन बंदुकीचे जिवंत काडतुसे आढळून आली आहेत. पोलिसांनी हि काडतूस जप्त करत सदर इसमाला सोनेगाव पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. 

नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळच्या सुमारास हा प्रकार समोर आला आहे. एकीकडे भारत आणि पाकिस्तान होणाऱ्या संभाव्य युद्धाच्या अनुषंगाने काल राज्यात मॉक ड्रिल करण्यात आला असताना त्याच्या दुसऱ्याच दिवशी नागपूरच्या विमानतळावर जिवंत काडतूस आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईसाठी जात असलेल्या प्रवाश्याच्या बॅगेतून हे काडतुस मिळून आले आहेत. इरफान खान सरदार खान हा मुंबईला जात असलेल्या प्रवाश्याचे नाव आहे.

काडतुस बाबत प्रवाशांकडून उत्तर नाही 

दरम्यान मुंबईला जाणाऱ्या इरफान खान हा नागपूरच्या विमानतळावर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणेकडून त्याची बॅग तपासणी करण्यात आली. या तपासणीत त्याचा बॅगेतून दोन काडतुस मिळून आले. याबाबत पोलिसांनी त्याला विचारपूस केली असताना हे काडतूस कुठून आणले याचे उत्तर उरफान यांच्याकडून देण्यात आले नाही. यामुळे पोलिसांनी अधिक चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले आहे. 

पोलिसात गुन्हा दाखल 
यानंतर सोनेगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करत अटक केली. न्यायालयात हजर करून एक दिवसाचा पीसीआर घेऊ चौकशीला सुरवात केली. मात्र काडतूस नेमके कुठून आणले आहेत. या संदर्भात ठोस माहिती अद्याप मिळाली नाही. उडवा उडवी उत्तर दिल्याने पोलिसांकडून याचा अधिक तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

SCROLL FOR NEXT