Jalgaon Rain : जळगाव जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा; ३२० गावांमध्ये फटका, शेती पिकांचे मोठे नुकसान

Jalgaon News : राज्यात अवकाळी पाऊस होत आहे. मागील दिवस जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. प्रामुख्याने जळगाव, चाळीसगाव व चोपडा तालुक्यात सर्वाधिक फटका बसला आहे
Jalgaon Rain
Jalgaon RainSaam tv
Published On

जळगाव : जळगाव जिल्ह्यात दोन दिवस अवकाळी पावसाने थैमान घातले होते. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील १० तालुक्यातील ३२० गावांना फटका बसला असून येथील सुमारे ७ हजार ७०४ शेतकऱ्यांच्या पिकाला वादळी फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.

राज्यात अवकाळी पाऊस होत आहे. मागील दिवस जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. प्रामुख्याने जळगाव, चाळीसगाव व चोपडा तालुक्यात सर्वाधिक फटका बसला आहे. वादळासह पावसाने जिल्हाभरात हजेरी लावली. या पावसाचा फटका ३२० गावांना बसला असून ७ हजार ७०४ शेतकऱ्यांचे ६ हजार ३९० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. 

Jalgaon Rain
Manmad News : हिंदुस्थान पेट्रोलियम सर्व्हर डाऊन; पेट्रोल पंपावरील इंधन पुरवठा ठप्प

१० तालुक्यांना पावसाचा फटका 

अवकाळी पावसाचा फटका जळगाव जिल्ह्यातील १० तालुक्यांना बसला आहे. त्यात चाळीसगाव, जामनेर, भडगाव, पाचोरा, जळगाव, रावेर, मुक्ताईनगर, यावल, बोदवड, चोपड़ा तालुक्याचा समावेश आहे. तर पारोळा, अमळनेर, धरणगाव, भुसावळ व एरंडोल तालुक्यातील पिकांना कुठलाही फटका बसलेला नाही. दरम्यान नुकसानीनंतर तलाठी, मंडळाधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सामूहिक पंचनामे केले. त्याचा प्राथमिक अहवाल येणे बाकी आहे.

Jalgaon Rain
Nashik : १६३ फ्लॅट धारकांची दोन कोटीची फसवणूक; मुंबईच्या चार बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध नाशिकमध्ये गुन्हा दाखल

अवकाळी पाऊस गारपीट याचा फळबागांना फटका

नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी सर्वत्र झालेल्या अवकाळी पाऊस व काही भागात झाल्या गारपिटीमुळे फळबागांना त्याचा फटका बसला आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यात काही भागात गारपीट झाल्याने त्याचा फटका डाळिंब, अप्पल बोर तसेच कांदा बियाणे (डोंगळे) यांना बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सरकारने नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com