Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News : नदी काठावर सापडले ८०० आधारकार्ड; नागपूर जिल्ह्यातील प्रकार, पोलिसांनी केले जप्त

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी परिसरातील वेणा नदी काठावरील परिसरात आधारकार्ड फेकलेले स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : मागील काही वर्षांपासून वितरित करण्यात आलेले जवळपास ८०० आधारकार्ड नदीच्या काठालगत फेकून देण्यात आल्याचा प्रकार नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आधारकार्ड जप्त करत पुढील तपासास सुरवात करण्यात आली आहे. 

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी परिसरातील वेणा नदी काठावरील परिसरात आधारकार्ड फेकलेले स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. स्थानिक नागरिकांच्या सदरची बाब लक्षात आल्यावर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी लागलीच घटनास्थळी येत स्पॉट पंचनामा करत फेकलेले आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे जप्त केले आहेत. यानंतर याचा तपास करण्यास सुरवात केली आहे. 

दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात सदरचे आधारकार्ड वानाडोंगरी पोस्ट ऑफिसमधून वितरित न केलेले आधार कार्ड असल्याची माहिती मिळाली. वानाडोंगरी येथील पोस्ट ऑफिसमध्ये गेल्या वर्षभरापासून आधार कार्ड वितरित न झाल्याने ते मोठ्या प्रमाणात पडून होते. या प्रकरणी पोस्ट ऑफिसमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पोलीस चौकशी करत आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Adulterated Sweets: ऐन सणासुदीत भेसळीचा काळाबाजार; बाजारात विकला जातोय नकली खवा?

Maharashtra News Live Updates: कल्याण पश्चिम विधानसभेतील शिवसेना शिंदे गटाचे बंडखाेर उमेदवार अरविंद मोरे यांची माघार

Fire Cracker Blast: स्कुटीवरून फटाके नेताना अचानक स्फोट झाला; Video बघून काळजाचा थरकाप उडेल

Maharashtra Politics: काँग्रेस पुन्हा फुटणार? कोल्हापुर, मुंबईत काँग्रेसला धक्के; विधानसभेनंतर राजकीय भूकंप होणार?

Assembly Election 2024: राज्यात वयाची शंभरी पार केलेले 47 हजार मतदार, महिला - पुरुषांची संख्या किती? निवडणूक आयोगाने दिली A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT