Nagpur Hit And Run Case:  Saamtv
महाराष्ट्र

Nagpur Accident: पुण्यानंतर नागपुरमध्येही हिट अँड रनची घटना! मॉर्निंग वॉक करणाऱ्या २ महिलांना भरधाव कारने उडवलं; VIDEO

Nagpur Hit And Run Case: एकीकडे पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण सर्वत्र चर्चेत असतानाच नागपुरमध्येही भरधाव कारने महिलेला चिरडल्याची घटना समोर आली आहे.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर|ता. ३० मे २०२४

पुणे शहरातील पोर्शे कार अपघाताने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या अपघातात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. अशातच हे प्रकरण ताजे असतानाच नागपुरमध्येही एक हिट अँड रन प्रकरण समोर आले आहे. नागपूरच्या शारदा चौकात मॉर्निंग वॉकला जाताना भरधाव कारने महिलेला चिरडल्याची घटना घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे शहरातील पोर्शे कार अपघातानंतर विविध भागातून हिट अँड रन प्रकरणाच्या अनेक घटना समोर येत आहेत. नागपूरच्या शारदा चौकात मॉर्निंग वॉकला जाताना भरधाव कारने एका महिलेला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये ममता अदमाने या गंभीर जखमी झाल्या आहेत.

ममता अदमाने या आपल्या मैत्रिणीसोबत जात असताना भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या मैत्रिणीलाही किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर ममता अदमाने यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अद्यापही त्या अंथरुणाला खिळून आहेत.

दरम्यान, ७ मे रोजी घडलेल्या या घटनेबाबत पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. धडक दिल्यानंतर कारचालक पसार झाला असून गाडीचा क्रमांक माहित नसल्याने शोध लागलेला नाही. तसेच जखमींच्या कुटुंबियांनी स्वतः जाऊन सीसीटीव्ही शोधून काढला मात्र यात पोलिसांनी तपास केला नसल्याचा दावा केला आहे. तसेच चालकाला पकडून शिक्षा देण्याची मागणी ममता अदमने यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर जिल्ह्यातील बारा नगरपालिका नगराध्यक्षपदाची निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार

ऐन निवडणुकीत कारमध्ये सापडली 10000000 रुपयांची रोकड; इतकी रक्कम नेमकी कुणाची?

ऐन निवडणुकीत अजित पवारांना मोठा हादरा; विश्वासू नेत्यानं साथ सोडली, तडकाफडकी राजीनामा

Sunday Horoscope: पैशाची तंगी होणार दूर, ५ राशींची होणार भरभराट, वाचा रविवारचे राशीभविष्य

VIDEO : भरधाव कारनं ४-५ दुचाकींना उडवलं, ट्रॅफिक हवालदार, २ वकिलांसह ५ जखमी, CCTV मध्ये अपघाताचा थरार कैद

SCROLL FOR NEXT