Yuvraj Mathankar Shiv Sena Join  Saam Tv News
महाराष्ट्र

Yuvraj Mathankar : नागपुरच्या कुख्यात गुंडाचा शिवसेनेत प्रवेश? शिंदे गटाकडून स्पष्टीकरण, म्हणाले...

Yuvraj Mathankar Shiv Sena Join : नागपूरचा कुख्यात गँगस्टर युवराज माथनकर शिवसेनेत दाखल झाला. मकोकासारख्या गंभीर आरोपांतून कारागृहात गेलेल्या माथनकरचा हा प्रवेश सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे सर्वांच्या नजरेत आला.

Prashant Patil

पराग ढोबळे, साम टिव्ही

नागपूर : महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आपापली ताकद वाढविण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्याचाच भाग म्हणून काल शनिवारी उपराजधानी नागपूरमध्ये शिवसेनेच्या (शिंदे गट) भव्य कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्यात हजारो कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख राजू तुमसरे, माजी नगरसेविका अलका दलाल, अजय दलाल यांच्यासह उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही माजी नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

या कार्यक्रमात एक असा प्रवेश झाला ज्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली. नागपूरचा कुख्यात गँगस्टर युवराज माथनकर शिवसेनेत दाखल झाला. मकोकासारख्या गंभीर आरोपांतून कारागृहात गेलेल्या माथनकरचा हा प्रवेश सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे सर्वांच्या नजरेत आला. या व्हिडिओत माथनकर थेट उपमुख्यमंत्र्यांच्या जवळ जाऊन शिवसेनेचा उपरणं स्वीकारताना दिसत आहे.

दरम्यान, त्याच्या या पक्षप्रवेशांच्या चर्चांबाबत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सुरज गोजे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, 'शिवसेनेचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश घेण्यात आला. यामध्ये आमच्या पक्षात युवराज माथनकर नामक व्यक्तीचा प्रवेश झाल्याचं माध्यमांमध्ये बातमी लागल्यामुळे आम्हाला कळलं. पण तसा पक्ष प्रवेश झाल्याचं शिवसेनेकडून फेटाळण्यात आलं आहे', असं गोजे यांनी स्पष्ट केलं आहे.

ते पुढे म्हणाले की, 'आमच्या पक्षप्रवेश घेणाऱ्यांच्या यादीत युवराज माथनकर याचं नाव नव्हतं. युवराज माथनकर नामक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी प्रवेश केल्याची माहिती आम्हाला नाही. काल पक्षप्रवेश होताना मोठ्या संख्येने गर्दी होती. याच गर्दीत तो कोणासोबत तरी आला असावा आणि त्याचा गळ्यात उपरणं टाकण्यात आलं असावं. त्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्यानं' शिवसेनेनं हे वृत्त फेटाळलं आहे.

तो मंचावर व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र, उपमुख्यमंत्री हे नगरविकास मंत्री असल्यानं अनेक लोक काम घेऊन येतात, तसा तो पण आला असू शकतो. तो व्हिडिओमध्ये दिसत आहे हे आम्ही नाकारत नाही, पण त्याचा पक्ष प्रवेशाशी संबंध नाही', असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उज्ज्वला थिटेंना धक्का, अनगरचा नगराध्यक्ष ठरला; जिल्हा न्यायालयानं नेमका निकाल काय दिला? VIDEO

India Tourism : काश्मीर-मनाली नाही; गुलाबी थंडीत आवर्जून फिरा 'हे' ठिकाण, जोडीदार होईल खुश

Blouse Fitting Tips: पहिल्यांदा ब्लाउज शिवायला देताय? मग परफेक्ट फिटींगसाठी लक्षात ठेवा या ट्रिक्स

Maharashtra Live News Update: आमदार चिखलीकर यांना भविष्यात मोठी जवाबदारी मिळणार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले संकेत

भाजपप्रणित NDA ला मोठा हादरा; घटक पक्षातील प्रमुख नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

SCROLL FOR NEXT