Nagpur Rada Amid Aurangzeb Tomb Row 
महाराष्ट्र

Nagpur Rada : कबरीचा वाद, नागपुरात दंगल, २५ हून अधिक पोलीस जखमी, शहरात जमावबंदी

Nagpur Rada Amid Aurangzeb Tomb Row : सोमवारी रात्री नागपूरमध्ये दोन गटामध्ये जोरदार राडा झाला. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे.

Namdeo Kumbhar

Clash Erupts In Nagpur Amid Aurangzeb Tomb Row : औरंगाजेबच्या कबरीवरून सोमवारी राज्यभर आंदोलन करण्यात आली. नागपूरमध्ये सोमवारी रात्री दोन गटामध्ये राडा झाला. दडगफेक करण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तैणात असणाऱ्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. यामध्ये २५ पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहे. नागपूर पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. नागपूर जिल्हाध्यक्ष आणि पोलिसांनी सोमवारी रात्रीपासून नागपूरमध्ये जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांततेचे आवाहन केले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून औरंगाजेबच्या कबरीवरून जोरदार वाद सुरू आहे. सोमवारी नागपूरमध्ये याला उग्र रूप आले. नागपूरमध्ये दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. जमावाकडून दगडफेक करण्यात आली. जाळपोळ आणि दगडफेकीनंतर नागपूरमधील वातावरण चिघळले. पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. जिल्हाअध्यक्ष आणि पोलिस कमिशनर यांनी तात्काळ शहरात जमावबंदी आणि मनाई आदेश लागू करण्यात आले.

नागपूरमध्ये सोमवारी रात्री जोरदार राडा झाला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दोन गटात हाणामारी आणि दगफेक झाला. जमावाला पांगवण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. जमावांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर करण्यात आला.

पोलिसांकडून रात्रीभर आरोपींची शोधमोहिम सुरू करण्यात आली. राडा झाला, त्याठिकाणाहून पोलिसांनी अर्धा ट्रॉली दगड जमा केले आहेत. पोलिसांनी सोमवारी रात्री कोंबिंग ऑफरेशन राबवत ५० संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून मुख्य सुत्रधारांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना शांततेचं आवाहन केलेय. नागपूरमध्ये सध्या पोलिसांचाा तगडा बंदोबस्त आहे. नागपूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून मुख्य आरोपीचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT