Nagpur Clash : औरंगजेबाच्या कबरीवरून मुख्यमंत्र्यांचं नागपूर पेटलं; महाल परिसरातील वादाचा घटनाक्रम काय?

Nagpur Clash update : दोन गटात राडा झाल्यानंतर नागपूर धुमसलं आहे. दोन गटात तुफान दगडफेक झाली आहे. त्यानंतर वाहनांची जाळपोळ देखील झाली आहे.
nagpur clash
nagpur news Saam tv
Published On

नागपुरात आज सोमवारी दोन गटात तुफान राडा झाला आहे. नागपुरात महाल परिसरात दगडफेकीची घटना घडली. दोन गटातील तणाव चिघळल्यानंतर काहींनी वाहनांची जाळपोळ केली. या तणावजन्य परिस्थितीत पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. औरंगजेबाच्या कबरीवरून सुरु झालेला हा वाद जाळीपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.

नागपुरात महाल परिसरात दोन गटात वाद झाल्यानंतर हिंसाचार उफाळला. दोन गटात दगडफेक झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी मोठ्या संस्ख्येने पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या. दोन्ही गटातील लोकांनी काही वाहने जाळली. नागपुरात परिस्थिती तणावपूर्ण परिस्थिती कायम आहे.

nagpur clash
Nagpur Police : पोलिसांनाच विकायला गेला ॲपल कंपनीचे मोबाईल, स्मार्टवॉच; चौकशीत सत्य आले समोर

नेमकं काय घडलं?

नागपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी साडे सात वाजता एक गट जमल्यानंतर नारेबाजी करू लागला. एका गटाच्या नारेबाजीवर दुसरा गट नाराज होता. औरंगाजेबाच्या कबर हटवण्याची भूमिका घेतलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या गटाचा रोष होता. दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. दोन्ही गटाच्या घोषणाबाजीमुळे पोलिसांना तातडीने बोलवण्यात आले.

nagpur clash
Hafiz Saeed Dead : भारताच्या मोठ्या शत्रूचा खात्मा? अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादीवर ठेवलं होतं 1 कोटी डॉलरचं बक्षीस,VIDEO

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी एका जमावाला शिवाजी महाराज चौकावरून चिटणीस पार्काच्या दिशेने हलवले. त्यानंतर भालदारपुरा परिसरात पोलिसांवरच मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरु झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली.

nagpur clash
Bharati Pawar Passed away : भारती पवार यांचं निधन, सामाजिक क्षेत्रात हळहळ; पुण्यात उद्या अंत्यसंस्कार

पोलिसांनी यावेळी जमावावर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. या दगडफेकीत गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एका गटाने एका जेसीबीला आग लावली. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून शहरात शांतता राखा, अफवा पसरवू नका, असे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com