Nagpur Earthquake Saam Digital
महाराष्ट्र

Nagpur Earthquake : नागपूर जिल्हा चौथ्यांदा हादरला, बुधवारी 4 वाजता पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के

Nagpur Earthquake News : नागपूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्हा चौथ्यांदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. बुधवारी दुपारी 4 च्या सुमारास कामठी परिसरात 2.4 तीव्रतेचे धक्के नोंदवले गेले आहेत.

Sandeep Gawade

नागपूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्हा चौथ्यांदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. बुधवारी दुपारी 4 च्या सुमारास कामठी परिसरात 2.4 तीव्रतेचे धक्के नोंदवले गेले आहेत. हे धक्के भूगर्भात पाच किलोमीटर खोल नोंदवले गेले आहेत. यापूर्वी पारशवनी उमरेड परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. गेल्या काही दिवसांपासून सतत भूंकपाचे धक्क जाणवत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे.

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात शुक्रवारी भूकंपाचे धक्के बसले होते. त्याची तीव्रता खूप कमी होती त्यामुळे नागरिकांना त्याची जाणीव झाली नाही. रिश्टर स्केलवर या भूकंपाची २.५ इतकी नोंद झाली होती. हा भूंकपाची घटना ताजी असताना असताना सलग दुसऱ्या दिवशी दुपारी २:२४ मिनिटांनी कुही तालुक्यात भूकंपाचे हादरे जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.४ होती.

नागपूर परिसरात सलग चारवेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे या भागात भीतीचं वातावरण आहे. नागपूर व आजूबाजूचा परिसर इंडियन प्लेट्सनी बनला आहे. त्यामुळे या प्लेट्सचं सारखं घर्षण होत असंत. मात्र सध्या झालेल्या भूकंपाची तिव्रता खूपचं कमी असल्यामुळे घाबरण्याचं कारण नसल्याचं भूगर्भ शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहेत. त्याच्या उत्खननासाठी नियमितपणे स्फोट घडवून आणले जातात. त्यामुळे पोकळी निर्माण होते. यातून भूकंपाचे धक्के बसू शकतात, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : संतापजनक! गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार; मांत्रिकाचं 'अघोरी' कृत्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

Shocking : सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने विहिरीत उडी मारून संपवलं आयुष्य; कोल्हापुरात खळबळ

Hotel Kitchen Food : धक्कादायक! तुमच्या जेवणात कचरा ? व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल | VIDEO

Ramayana: जगातील सर्वात भव्य महाकाव्यांचा आरंभ 'रामायण'; अभिनेता रणबीर कपूरची मोठी भूमिका

SCROLL FOR NEXT