Hypervolemia Symptoms: 'या' 9 पदार्थांमुळे शरीरात तयार होते जास्त प्रमाणात रक्त, वाढतो किडनी व हृदयविकाराचा धोका !

Health Tips: आपल्या शरीरामधील रक्त प्लाजमा, रेड ब्लड सेल्स, वाईट1 ब्लड सेल्स आणि प्लेटलेट्स या सगळ्यांपासून बनते.
Hypervolemia
HypervolemiaSaam Tv
Published On

Fluid Overload : सुदृढ शरीरासाठी आपल्या शरीरामध्ये रक्ताचे योग्य प्रमाण असणे अतिशय गरजेचे आहे. आपल्या शरीरामधील रक्त प्लाजमा, रेड ब्लड सेल्स, वाईट1 ब्लड सेल्स आणि प्लेटलेट्स या सगळ्यांपासून बनते.

शरीरामधील कमी रक्ताच्या प्रमाणामुळे आपल्याला अनेक समस्या उद्भवू शकतात. अशातच शरीरामधील वाढते रक्ताचे प्रमाण आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. शरीरामध्ये प्रमाणापेक्षा जास्त रक्त निर्माण झाले तर तुम्हाला हार्ट अटॅक देखील येऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण वाढल्यावर आणखीन कोणती लक्षणे दिसून येतात.

Hypervolemia
Health Tips : व्हायरल फिव्हरचा जास्त ताण; ठरु शकते मृत्यूचे कारण

आपल्या शरीरातील नसांमधील वाढत्या रक्तदाबाला हायपर वोलेमिया या नावाने ओळखले जाते. यामुळे शरीरामधील अनेक अंगांना सूज येते. त्याचबरोबर हार्ट फेलची संभावना वाढते. शरीरामध्ये जेव्हा उच्च रक्तदाब होतो तेव्हा या गोष्टीवर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. नाहीतर या गंभीर समस्या प्रमाणात वाढू लागतील.

शरीरामध्ये जास्त रक्ताचे प्रमाण वाढल्यावर ही लक्षणे दिसून येतात.

1. पायांना सूज येणे त्याचंबरोबर चेहऱ्याला , मनगटाला सुज येणे.

2. डोकेदुखी (Headache), पोट फुगणे

3. उच्च रक्तदाब.

4. श्वास घेण्यासाठी अडथळा.

5. असामान्य धडधड.

6. वजन वाढणे.

Hypervolemia
Morning Health Tips : सकाळी करा भरपेट नाश्ता, अनेक आजारांचा धोका होईल कमी !

हायपर वोलेमियाच्या मागे अनेक अंगे असू शकतात. ज्यांनी काम करणे बंद केलं असेल. याशिवाय शरीरामध्ये जास्त प्रमाणात रक्त वाढले असेल तर किडनी (Kidney), हृदय विकार, लिव्हर फेल होण्याचे चान्सेस दिसून येतात.

1. ही चूक केल्याने शरीरामध्ये जास्त प्रमाणात रक्त वाढते :

गरजेपेक्षा जास्त प्रमाणात मिठाचे पदार्थ खाल्याने हाइपर वोलेमिया होऊ शकतो. कारण की, शरीरामधील सोडियमचे प्रमाण वाढल्याने रक्तदाब देखील वाढू लागतो. त्यामुळे तुम्हाला तुमच ब्लडप्रेशर ठेवायचं असेल तर, मिठाचे सेवन अगदी कमी प्रमाणात करा.

Junk Food
Junk Foodcanva

2. या पदार्थांपासून रहा दूर :

आपण दिवसभरात अनेक वेळा फास्ट फूड (Food) खातो. ज्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर पाहायला मिळतो. ब्रेड, पिझ्झा, रोल, सँडविच, चिकन, चीज, अंडी, आमलेट यासारख्या पदार्थांमध्ये सोडियम जास्त प्रमाणात उपलब्ध असते. म्हणून पिझ्झा, सँडविच, बर्गर, चीज यांसारख्या पदार्थांपासून लांब राहिले पाहिजे. परंतु तुम्ही अंडी (Eggs), सूप, चिकन यांसारखे हेल्दी फूड कमी प्रमाणात खाऊ शकता.

3. शरीरामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये असलं पाहिजे रक्त :

प्रत्येक मानवी शरीरामध्ये ज्याच्या त्याच्या वजन आणि उंचीवरून पर्याप्त प्रमाणात रक्त असले पाहिजे. एका अध्ययनानुसार महिलांमध्ये पाच लिटर रक्त असल्याची माहिती दिली जाते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com