Nagpur Graduate Constituency Election Result Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Election Result : फडणवीसांच्या नागपुरात भाजपचा करेक्ट कार्यक्रम; 'मविआ'चा उमेदवार विजयी

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Nagpur Graduate Constituency Election Result : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील आणखी एका विजयाची बातमी सध्या समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात भाजपला मोठा धक्का बसला आहे. नागपुर शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडी पुरस्कृत कॉंग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी विजय मिळवला आहे. (Latest Marathi News)

त्यांनी भाजप पुरस्कृत उमेदवार नागो गाणार यांचा दारूण पराभव केला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला होता. त्यामुळे या निवडणुकीत कुणाचा विजय होईल, याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं.

दरम्यान, आज मतमोजणी सुरूवात होताच, महाविकासआघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी सुरूवातीलाच आघाडी घेतली. पहिल्याच फेरीत त्यांनी ११९०० मत मिळवली होती, तेव्हाच त्यांचा विजय निश्चित झाला होता. आता याबद्दलची अंतिम बातमी समोर येत आहे. ज्यामध्ये अडबालेंनी विजय मिळवला आहे. विजयानंतर अडबाले यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरू केला आहे. (Maharashtra Political News)

नागो गाणार हे भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार होते. मागील दोन टर्म गाणार हे आमदार होते. ते हॅटट्रिक करतील, असं सांगितलं जात होतं. परंतु महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले हे विजयी झालेले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. 'भाजप मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा भाजपला दणका. नागपूर शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले विजयी' असं ट्विट पटोलेंनी केलं आहे.

विधानपरिषद नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक ३४ हजार ३६० पत्रिकांपैखी २८ हजार मतमोजणीत पहिल्या पसंतीच्या मतामधील एक हजार ९९ मते अवैध ठरली तर २६ हजार ९०१ मते वैध होती. २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यापैकी १९ जणांचं डिपॉझिट जप्त होणार आहे. 

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: घाटकोपर पूर्वमधून पराग शाह विजयी

Eknath Shinde News : हा विजय न भूतो न भविष्यति आहे, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया | VIDEO

Naresh Mhaske: महायुतीचा हा एकतर्फी विजय आहे, नरेश म्हस्के यांनी दिली प्रतिक्रिया| Video

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले लाडक्या बहीणींचे आभार

SCROLL FOR NEXT