Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime : पहलगाम हल्ल्यात बँकेतून व्यवहार, डिजिटल वॉरंट दाखवत धमकी; वृद्धाला १९ लाखाचा गंडा

Nagpur News : पहलगाम हल्ल्यात तुमच्या बँक खात्यातून सात कोटी रुपयांचा व्यवहार झाला. यात तुम्हाला ७० लाखांचे कमिशन मिळाल्याची धमकी देत डिजिटल अरेस्ट करण्यात आले यात ७० लाखांचे कमिशन मिळाल्याची धमकी

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 
नागपूर
: सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या पद्धतीने ऑनलाईन फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. मागील काही दिवसात तर डिजिटल अरेस्ट करण्याचे प्रकार वाढले असून नागपूरमध्ये चक्क पहलगाम हल्ल्यात तुमच्या बँक खात्यातून व्यवहार झाल्याची भीती दाखवून डिजिटल अरेस्ट करण्यात आले. यातून एका ज्येष्ठ नागरिकाची १९ लाख ५० हजार रुपयात फसवणूक करण्यात आली आहे. 

सायबर गुन्हेगार फसवणूक करण्यासाठी वेगवेगळे फंडे आजमावत आहेत. समोरच्या व्यक्तीला वेगवेगळे आमिष दाखवून फसवणूक केली जात आहे. तर कधी एखादी बनावट लिंक पाठवून फसवणूक करण्यात येत आहे. मात्र मागील काही दिवसात समोरच्या व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करत भीती दाखवून गंडा घातल्याचा घटनांमध्ये वाढ झाली आहे. असाच प्रकार नागपूरमध्ये समोर आला असून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

डिजिटल वॉरंट दाखवत धमकी 

दरम्यान सायबर गुन्हेगारांकडून नागपुरातील एका ज्येष्ठ व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करत फसवणूक केली आहे. यात पहलगाम हल्ल्यात तुमच्या बँक खात्यातून सात कोटी रुपयांचा व्यवहार झाला. यात तुम्हाला ७० लाखांचे कमिशन मिळाल्याची धमकी देत डिजिटल अरेस्ट करण्यात आले होते. यात आरोपींनी डिजिटल वॉरंट दाखवत ज्येष्ठ नागरिकाला अटकेची धमकी दिली.

ओटीपी सांगताच काढली रक्कम 

सायबर गुन्हेगाराने पहेलगाम मधील प्रकरणात सहभागी असल्याची भीती दाखवत डिजिटल वॉरंट दाखविला. यामुळे अटक टाळायची असेल तर भ्रमणध्वनीवर आलेला ओटीपी नंबर मागितला. यातून घाबरलेल्या खापेकर यांनी भीतीपोटी ओटीपी नंबर देताच सायबर ठिकाणी त्यांच्या खात्यातून १९ लाख ५० हजारांची रक्कम खात्यातून काढून घेतली. नागपूरच्या वाठोडा पोलीस स्टेशन हद्दीतील अनमोल नगर परिसरात ही घटना उघडकीस आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नव्या शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा? जाणून आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT