पराग ढोबळे
नागपूर : सायबर गुन्हेगारांकडून मनी लॉन्ड्रींगची भीती दाखवून फसवणूक केली जात आहे. अशाच प्रकारे नागपुरातील एका वृद्धाला मनी लॉन्ड्रिंगच्या बनावट प्रकरणात अकाऊंट वापरण्यात आल्याचे असून डिजिटल अरेस्ट करत असल्याचे म्हणत तब्बल ३१ लाख रुपयात फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी एका सायबर गुन्हेगाराला ताब्यात घेतले आहे.
सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वेगवेगळे फंडे आजमावत अनेकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. अशात डिजिटल अरेस्ट करत पैशांची मागणी करत फसवणूक केली जात असल्याचे प्रकार देखील वाढले आहेत. असाच प्रकार नागपुरात समोर आला असून एका वृद्धाची फसवणूक करण्यात आली आहे. पीडित वयोवृद्धाला डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगण्यात आल्याने घाबरून गेले. याचाच फायदा घेत मानसिक दबाव टाकत तब्बल ३१ लाख खात्यात रक्कम जमा करण्यास भाग पाडले.
भुवनेश्वर येथून संशयित ताब्यात
एवढेच काय तर वृद्धाने एफडी मोडून त्यांना हे पैसे ट्रान्सफर केले. या प्रकाराबाबत फसवणूक झालेल्या वृद्धाने नागपूरच्या सायबर पोलिसात तक्रार दिली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक तपास, खात्यांचे व्यवहार, लोकेशनच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन या सायबर गुन्हेगारास भुवनेश्वर येथे सापळा रचून अटक करण्यात आली.
१९ लाख रुपये गोठविले
रंजनकुमार पटनाईकची (वय ६०) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीने वळते केलेल्या खात्यामध्ये सध्या १९ लाख रुपये गोठवण्यात आले आहेत. तर फिर्यादीला टेलिकॉम विभाग आणि पोलीस अधिकारी असल्याचे भासवून, सुप्रीम कोर्ट, RBI, ED यांच्या नावाने बनावट दस्तऐवज पाठवून धमकावत डिजिटल अरेस्ट केल्याचे आरोपीने म्हटलं आहे. सध्या आरोपी सायबर पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची टोळी आहे का? कोणा कोणाची आणखी फसवणूक केली तर नाही; या सगळ्याचा तपास सायबर पोलीस करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.